शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळ वळण मार्ग निर्मितीच्या नव्याने निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 23:59 IST

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाचा कायापालट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा : प्राधिकरणाच्या वेगवान हालचालीअमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाचा कायापालट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पूर्वी संरक्षण भिंत निर्मितीसाठी जळू ते बेलोरा या गावादरम्यान वळण मार्ग निर्मितीच्या निविदा काढल्या जाणार आहेत. त्याकरिता महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने बांधकाम विभागाकडून दरपत्रक मागविले आहे.यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन सचिव मीना यांनी बेलोरा विमानतळ वळण मार्गासाठी लागणाऱ्या १३.२८ कोटी रुपयांचा खर्चावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे दोन वर्षांपासून जळू ते बेलोरा वळण मार्गासाठी प्राप्त दरकराराच्या फाईलवर कोणताही निर्णय होऊ शकला नाही, हे वास्तव आहे. मात्र मीना हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवपदी गोयल हे आले आहेत. प्रलंबित फार्इंलीचा निपटारा करण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. बेलोरा विमानतळाचे विकास कामे त्वरेने मार्गी लागावे, यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, आ. रवि राणा हे सतत प्रयत्नशील आहेत. विमानतळाच्या वळण मार्गाचा प्रश्न सुटल्याशिवाय बेलोरा विमानतळाचे विकास काम करणे अशक्य असल्याची बाब लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मांडली आहे. जळू ते बेलोरा दरम्यान ३. ९० कि. मी. च्या वळण मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १३.२८ कोटी रुपयांचे दरपत्रक पाठविले आहे. सामान्य प्रशासन विभागाने या दरपत्रकाला मंजुरी दिली की बांधकाम विभाग वळण मार्गाच्या निर्मितीसाठी नव्याने निविदा काढणार, असे संकेत आहेत. या मार्गासाठी लागणारे भूसंपादन पाच वर्षांपूर्वीच झाले आहे. सदर प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. मात्र बेलोरा विमानतळाच्या वळणमार्ग निर्मितीची फाईल मंत्रालयात प्रलंबित असल्याने हा मार्ग त्वरेने निर्माण होऊ शकला नाही. परंतु वळण मार्ग निर्मितीत येणारे अडथळे दूर करण्यात लोकप्रतिनिधींना यश आले आहे. येत्या महिनाभरात बेलोरा ते जळू वळण मार्ग निर्मितीच्या निविदा प्रसिद्ध करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता निर्मितीची जबाबदारी सोपविली जाणार आहे.