परतवाडा : ऑटोरिक्षात विसरलेली, तीन लाख रुपयांची दागिने असलेली बॅग परतवाडा पोलिसांच्या तत्परतेमुळे परत मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याची दिवाळी चांगली होऊ शकली.धारणी तालुक्यातील दहेंडा येथील जीवन विकास विद्यालयात कार्यरत विलास भोंगाडे २५ ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांसमवेत परतवाडा शहरात दाखल झालेत. ऑटोरिक्षाने कांडलीतील नातेवाइकांकडे ते गेले. दरम्यान, त्यांचे कुटुंबीय स्वत:जवळील बॅग त्याच ऑटोरिक्षात विसरले. त्या बॅगमध्ये ७० ग्रॅम वजनाचे दागिने व १२ हजार रोख रक्कम होती. विलास भोंगाडे यांनी ऑटोरिक्षाच्या वर्णनासह परतवाड्याचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांना माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून २६ ऑक्टोबर रोजी ऑटोरिक्षाचालक मो. शहजाद अब्दुल वहाब (रा. बियाबाणी) कडून ती बॅग हस्तगत केली व विलास भोंगाडे यांच्या स्वाधीन केली. सहायक पोलीस निरीक्षक नीलेश करंदीकर, सहायक उपनिरीक्षक मोहन मोहोड, हेडकॉन्स्टेबल प्रमोद फलके, प्रमोद चौधरी, नायक पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम बावनेर, दीपक डाहे, संतुलाल उईके, दिनेश राऊत, दीपक राऊत, जयसिंह चव्हाण यांनी ही कारवाई पूर्णत्वास नेली.
तीन लाखांची बॅग मिळाली; दिवाळी चांगली झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST
धारणी तालुक्यातील दहेंडा येथील जीवन विकास विद्यालयात कार्यरत विलास भोंगाडे २५ ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांसमवेत परतवाडा शहरात दाखल झालेत. ऑटोरिक्षाने कांडलीतील नातेवाइकांकडे ते गेले. दरम्यान, त्यांचे कुटुंबीय स्वत:जवळील बॅग त्याच ऑटोरिक्षात विसरले.
तीन लाखांची बॅग मिळाली; दिवाळी चांगली झाली
ठळक मुद्देतत्परता : परतवाडा पोलिसांविषयी कृतज्ञता