शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा रेल्वेस्थानक असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:52 IST

स्थानिक रेल्वेस्थानकावर एका १९ वर्षांच्या मुलाला २५ हजार व्होल्ट ओव्हरहेड विद्युत वाहिनीची सेल्फी काढण्याच्या नादात जबर धक्का बसला. यापूर्वीदेखील अशीच एक घटना घडली. अशा प्रकरणांमुळे बडनेरा रेल्वे स्थानक असुरक्षित असल्याचे प्रवाशांमध्ये बोलले जात आहे.

ठळक मुद्देप्रवासी वाऱ्यावर : आरपीएफ, जीआरपी करतात काय?

श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : स्थानिक रेल्वेस्थानकावर एका १९ वर्षांच्या मुलाला २५ हजार व्होल्ट ओव्हरहेड विद्युत वाहिनीची सेल्फी काढण्याच्या नादात जबर धक्का बसला. यापूर्वीदेखील अशीच एक घटना घडली. अशा प्रकरणांमुळे बडनेरा रेल्वे स्थानक असुरक्षित असल्याचे प्रवाशांमध्ये बोलले जात आहे. आरपीएफ, जीआरपी रेलवे स्थानकाच्या व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी करतात तरी काय, असा सवाल भयग्रस्त प्रवासी तसेच शहरसीयांमध्ये विचारला जात आहे.तीन वर्षांपूर्वी बडनेरा रेल्वे स्थानकावर एका विद्यार्थ्यांचा पेट्रोलने भरून असणाºया टॅँकवर मोबाइलमध्ये सेल्फी काढत असताना २५ हजार वोल्ट ओव्हरहेड विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. तो पुण्याचा होता. इतर मित्रांसोबत अमरावतीत अभ्यास दौºयासाठी आला होता. तसेच नुकतेच १० डिसेंबर रोजी चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथील १९ वर्षीय युवक अंकुश चव्हाण हा सेल्फी काढण्याच्या नादात ओव्हरहेड विद्युत वाहिनीकडे खेचला गेला. तो खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. हादेखील एका ज्वलनशील असणाºया टॅँकरवर चढला होता, असे बोलले जात आहे. अशा दोन घटनांमुळे आरपीएफ, जीआरपीचे रेल्वे स्थानकाच्या व प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष आहे का, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे या रेल्वे स्थानकावरील एका कॅन्टीनलादेखील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. ती आग विझविण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. नुकताच एका प्रवाशाचा कटून मृत्यू झाला. अशा घटना येथे नित्याच्याच झाल्या आहेत. एकूणच या घटनांमध्ये आरपीएफ व जीआरपीच्या कार्यक्षमतेवर प्रवासी वर्गांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.मोबाईलचोर सक्रियरेल्वे स्थानकावर मोबाईल व पाकीटमारीच्या घटना रोज घडत आहेत. रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे येथे चोरटे सक्रिय झाले आहे. विभागीय शहराला लागून असल्याने बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्याचाच चोरटे गैरफायदा घेत आहे. प्रवासी तक्रारी देत नसल्याने त्यांचे फावत आहे.स्टॉलधारकांचा माल जातो रुळावरूनस्टॉलधारक सर्रास त्यांचा माल रेल्वे रुळावरुन नेतात. मालगाडी असो की प्रवासी गाडी त्यांना रेल्वेच्या नियमाची कुठलीच भीती वाटत नाही. त्यांच्यावर थातूरमातूर कारवाई केली जाते. त्यांचा माल ब्रिजवरुनच प्लॉटफॉर्मवर यायला पाहिजे. हा सर्व धोकायदायक प्रकार प्रशासनाच्या डोळ्यासमोरच होत असतो.अवैध खाद्य पदार्थ विक्रेत्यांचा भरणाबडनेरा रेल्वे स्थानकावर अवैध खाद्य पदार्थ विक्रेत्यांची दादागिरीच असल्याचे चित्र आहे. मनमानी कारभार येथे सुरू आहे. पोलिसांचा धाकच नसल्याने अवैध खाद्य पदार्थ विक्रेते मोठ्या संख्येत रेल्वे स्थानकात शिरले आहेत. चढ्या भावात विक्री होत आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे