शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडू सचिन तेंडुलकरच्या मागे हात धुवून लागणार; दोन दिवसांत वकीलामार्फत नोटीस बजावणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 09:54 IST

आशा सेविकांना जबरदस्ती कोणीही ऑनलाइन कामाची सक्ती केल्यास संबधित अधिकाऱ्याला झोडपून काढू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 

माजी मंत्री बच्चू कडू आता प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरच्या मागे हात धुवून लागणार आहेत. आज कडू यांनी याची माहिती दिली आहे. 30 ऑगस्टला कडू त्यांच्या वकिलाकरवी तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठविणार आहेत. 

ऑनलाईन गेमची जाहिरात करणं मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याला भोवणार असल्याची चिन्हे आहेत. ऑनलाईन गेमची जाहिरात सचिन तेंडुलकरने केल्यामुळे आमदार बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. ही जाहिरात केल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांना 30 तारखेला वकीला मार्फत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

भारतरत्नांनी कुठली जाहिरात करावी, कुठली नाही याची आचारसंहिता आहे. त्यामुळे आता तेंडुलकरला वकिलामार्फत नोटीस पाठवल्यानंतर आंदोलनाची घोषणा करू, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.  

आशा सेविकांना आरोग्य विभागाकडून ऑनलाईन काम करण्यासाठी सक्ती करुन कामावरुन कमी करण्याची धमकी अधिकारी वर्गाकडून देण्यात येत आहे. परंतु या आशा सेविकांना मिळणाारे मानधन हे तुटपुंज्या स्वरूपाचे असून त्यांच्याकडे इतरही अनेक कामे आहेत. अशा परिस्थितीमध्ये ऑनलाइन काम कसे करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार बच्चू कडू यांच्या वेरूळ पूर्णा येथील घरी जाऊन आशा सेविकांनी आमदार बच्चू कडूंना  त्यांना राखी बांधत आपली समस्या मांडली होती. यावेळी बच्चू कडू यांनी तातडीने संबधित अधिकाऱ्यांना फोन लावून संपर्क साधला. आशा सेविकांना जबरदस्ती कोणीही ऑनलाइन कामाची सक्ती केल्यास संबधित अधिकाऱ्याला झोडपून काढू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.  

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूSachin Tendulkarसचिन तेंडुलकर