शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

...तर राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटात मतदान करू, बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 17:01 IST

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडले आहे.

अमरावती : राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवरुन वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून ते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरू करावी. अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतचा निर्णय शेवटच्या पाच मिनिटांमध्ये घेऊ, अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. 

येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सहाव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेने या जागेसाठी संजय पवार यांना उतरवले असून भाजपकडून धनंजय महाडिक हे रिंगणात आहेत. ही जागा निवडून आणण्यात अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र, अशातच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडले आहे.

राज्यात हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख व धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख इतकी आहे. परंतु, आता केंद्र सरकार माल खरेदी करण्यासाठी तयार नसल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने धान खरेदी केली नाही तर एका हेक्टरला चार हजार रूपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला हवा. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हालचाली कराव्यात, असे बच्चू कडू म्हणाले. पण जर या मागणीकेड दुर्लक्ष केलं तर राज्यसभेचे मतदान हे शेवटच्या पाच मिनिटात करू असा इशाराही बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. 

आशिष जयस्वाल यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री अपक्ष आमदारांना निधी देताना टक्केवारी मागतात. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता नसली तरी भविष्यात राज्य सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असे आशिष जयस्वाल यांनी म्हटले. त्यानंतर आता बच्चू कडूंनी देखील सरकारला इशारा दिला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBacchu Kaduबच्चू कडूMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajya Sabhaराज्यसभा