शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बा विठ्ठला, सर्वांना पर्यावरण रक्षणाची सद्बुद्धी दे! अमरावतीचे सायकल वारकरी साकडे घालण्यासाठी पंढरीच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 01:25 IST

यावेळी त्यांनी वाटेवरील सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व पटवून देण्याचा निर्धार केला.

मनीष तसरे -अमरावती : वारकऱ्यांचा श्वास असलेल्या पंढरीच्या वारीची महती शब्दातीत आहे. वारी ही बघण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट. पंढरीला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच अमरावती सायकल असोसिएशनच्या सदस्यांनी अमरावती-पंढरपूर अशा ६०० किमीच्या सायकल वारीला श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीचे दर्शन करून बुधवारी सकाळी सुरुवात केली. यावेळी त्यांनी वाटेवरील सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व पटवून देण्याचा निर्धार केला.

अमरावती सायकल असोसिएशनचे राजीव देशमुख, राजेश धोटे, नरेंद्र भटकर, रामराव उईके, विनोद निशितकर, विजय महल्ले, आनंद वानखडे, सदानंद देशमुख, डॉ. देवेंद्र चौधरी, केशव निकम, ऋषिकेश इंगोले व आशिष बोरकर हे सदस्य बुधवारी सकाळी सहा वाजता निघाले. दररोज १०० किमी व शेवटच्या दिवशी २०० किलोमीटरचा प्रवास करत ते ६ जुलैला पंढरपूर पोहोचणार आहेत. त्यासाठी दररोज आपण ४० ते ५० किलोमीटर सायकल चालविण्याचा सराव केल्याचे त्या सायकलस्वारांनी ‘लोकमत’ला सांगितले.

सायकल रिंगणात सहभागआषाढी वारीनिमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी पायी वारी करतात. सोबतच महाराष्ट्रातील अनेक सायकलस्वार देखील पंढरपुरात दाखल होतात. ७ जुलै राेजी महाराष्ट्रातील सायकलस्वाराचे रिंगण ज्या ठिकाणी होते, त्यात आम्ही देखील सहभागी होणार असल्याचे अमरावती सायकल असोसिएशनचे सदस्य आनंद वानखडे यांनी सांगितले. अमरावती-वाशिम-तूळजापूर, पंढरपूर असा ६०० किलोमीटरचा प्रवास आम्ही चार दिवसांत पूर्ण करणार आहोत, असे राजीव देशमुख यांनी सांगितले.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीPandharpurपंढरपूर