शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

गाव समित्यांवर कोरोना नियंत्रणाची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 5:00 AM

कोरोनाबाबत जनजागृती व प्रबोधनासाठी गाव समित्यांचे सहकार्य घेण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे व इतर विविध विभागांच्या सहकार्याने प्रबोधन मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये गावातून नियमितपणे कामानिमित्त गावाच्या बाहेर ये-जा करणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करून नोंद घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत, शिक्षकांवर जबाबदारी : गावोगावी प्रबोधन, मोक्याच्या ठिकाणी सूचनापत्रांचे स्टीकर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी ग्रामीण भागात नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहीम राबविणे, त्याबाबत नोंदी पोर्टलवर घेऊन संवाद केंद्रामार्फत त्यांच्या आरोग्याची माहिती घेणे तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबतचे प्रबोधन व जनजागृती गावातील नागरिकांमध्ये गाव कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीमार्फत करण्यात येत आहे.कोरोनाबाबत जनजागृती व प्रबोधनासाठी गाव समित्यांचे सहकार्य घेण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे व इतर विविध विभागांच्या सहकार्याने प्रबोधन मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये गावातून नियमितपणे कामानिमित्त गावाच्या बाहेर ये-जा करणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करून नोंद घेण्यात येत आहे. गावातील नागरिकांना वैयक्तिक प्रवासादरम्यान दक्षता, कामाच्या ठिकाणी स्वच्छता व आरोग्यविषयक सूचनांचे पालन करण्याबाबत प्रबोधन, गावातील दुकानदार, व्यापारी, आस्थापना मालक ज्यांना मालाच्या खरेदी-विक्रीसाठी शहरात जावे लागते, अशा दुकानदारांनी कोणती दक्षता घ्यावी, यासाठीचे स्टीकर त्यांचे दुकानापुढे लावण्यात येत आहेत. त्याचबरोबर दुकानात येणाऱ्या ग्राहकांना वस्तू खरेदी करताना दुकानाबाहेर शारीरिक अंतराचे पालन होण्याबाबत दुकानदार व नागरिकांमध्ये प्रबोधन करणे, वैयक्तिक स्वच्छता पाळण्याची दक्षता घेण्यासाठी सूचनापत्रांचे स्टीकर गावातील प्रत्येक दुकानाचे बाहेर लावण्यात येत आहेत.गृह अलगीकरणातील व्यक्तींच्या घरावर लावावयाचे स्टीकर व त्यामध्ये त्यांनी कोणती दक्षता घ्यावयाची आहे, याबाबतची नियमावली नमूद करण्यात आलेली आहे. नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले.ग्रामपंचायत स्तरावर जागरसर्व ग्रामपंचातींना जनजागृतीचे साहित्य, बॅनर आदी वाटप करण्यात आले असून, त्यामध्ये कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या व्यक्त ींसाठी आवश्यक असणाऱ्या सूचनापत्रांचे स्टीकर, दुकानदार व आस्थापना मालक यांच्यासाठी सूचनापत्रांचे स्टीकर, दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी सूचनापत्रांचे स्टीकर, गृह विलगीकरण पाळणाऱ्या व्यक्तींसाठी सूचनापत्र आदी साहित्य पुरविण्यात आले. ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आणि सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामपंचायत परिसरात जनजागृती करण्यात येत आहे.आरोग्य तपासणी मोहीमजनजागृतीसोबत गावातील नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी आशांना पल्स ऑक्सीमीटर पुरविण्यात आले असून त्याद्वारे नागरिकांच्या आरोग्याबाबतची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. लक्षणे आढळून येत असलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच कोविड सकारात्मक रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्ट नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणीला करण्यात आली आहे. कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्यास वा कोविड सकारात्मक रुग्णांच्या संपर्कात आल्यास आरोग्य यंत्रणेला माहिती कळवावी तसेच गावपातळीवरील कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या