शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सीपींनी सांभाळली आक्रोश मोर्चाची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध सभा व मोर्चाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी बंदोबस्ताची धुरा सांभाळली. वलगाव मार्गातील डिप्टी ग्राऊंड ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याने हा आक्रोश मोर्चा शांततेत पार पडला.

ठळक मुद्दे६०० पोलीस रस्त्यावर : डिप्टी ग्राऊन्ड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तगडा बंदोबस्त

अमरावती : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध सभा व मोर्चाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी बंदोबस्ताची धुरा सांभाळली. वलगाव मार्गातील डिप्टी ग्राऊंड ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याने हा आक्रोश मोर्चा शांततेत पार पडला.मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी असे एकूण ६०० जण रस्त्यावर पहारा देत होते. याशिवाय अतिरिक्त स्ट्रायकिंग फोर्स, आरसीपी प्लाटूनसुद्धा ठिकठिकाणी सज्ज करण्यात आली होती. मोर्चादरम्यान पोलिसांनी वाहतूक नियंत्रणाची विशेष काळजी घेतली. मोर्चाचे व्हिडीओ चित्रीकरण, उंच इमारतीवरून दुर्बिणीने नागरिकांवर लक्ष ठेवले तसेच साध्या पोषाखात एटीसी आणि विशेष शाखेचे पोलीस मोर्चात तैनात होते. या बंदोबस्तासाठी पोलीस सर्व्हिस रिव्हॉल्व्हर, वॉकी-टॉकी, ढाल, लाठी, हेल्मेट, गॅस गन, रबर बुलेटसह गन, पीए सिस्टीम तसेच आवश्यक ते साहित्य घेऊन हजर होते.फिक्स पॉर्इंटची जबाबदारीनागपुरी गेटचे पोलीस निरीक्षक यांनी नागपुरी गेट ते गर्ल्स हायस्कूल चौकापर्यंत फिक्स पॉइंटची जबाबदारी सांभाळली. यासाठी १५ पोलीस उपनिरीक्षक आणि ९० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.सहा पोलीस निरीक्षकांच्या नेत्तृत्वात पाच एपीआय व पीएसआय आणि ५२ पोलीस शिपाई मोर्चाच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर तैनात करण्यात आले होते. मोर्चात सहभागी नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी सुरक्षा दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बॅरिकेडिंगजिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा अडविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी असा एकूण १४९ पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. बॅरिकेडिंग करून मोर्चेकऱ्यांना तेथे थांबविण्यात आले. यामध्ये चार पोलीस निरीक्षक, नऊ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, १२३ पोलीस शिपाई आणि १३ महिला पोलिसांचा सहभाग होता.सभास्थळाला पोलिसांचा घेरावडिप्टी ग्राऊंड येथील सभास्थळाच्या बंदोबस्ताची धुरा पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर यांनी सांभाळली. पाच पोलीस निरीक्षक, सात उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक, ९४ शिपाई अशा पोलीस ताफ्याने सभास्थळाला सुरक्षा पुरविली. याशिवाय आरसीपी व क्यूआरटीचे एक-एक पथकही तैनात होते.

टॅग्स :Policeपोलिस