लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आॅक्टोबर महिन्यात ६ ते २४ दरम्यान भारतात आयोजित विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यानिमित्त जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाने शुक्रवारी ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ हा उपक्रम राबविला. त्याअनुषंगाने शुक्रवारी अवघा जिल्हा फुटबॉलमय झाला होता. येथील विभागीय क्रीडा संकुलात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ‘कीक’ मारून फुटबॉल सामन्यांचे उद्घाटन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिलेला ‘खेलेगा वो खिलेगा’ हा संदेश राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने शहर, गावखेड्यात पोहोचविला आहे. १५ सप्टेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘फिफा वर्ल्ड कप’ अंतर्गत ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले. एकाच दिवशी जिल्ह्यात १४०० मैदानांवर चार हजार फुटबॉल सामने खेळण्यात आले. येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित फुटबॉल सामन्यांचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या उपसंचालक प्रतिभा देशमुख होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.च्या प्राथमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके, स्काऊट-गाईडच्या घोम, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते.यावेळी महानगरातील हजारो विद्यार्थ्यांच्या गर्दीने क्रीडा संकुल फुलून गेले होते. यावेळी पालकमंत्र्यांना निवडक चित्रे, निबंध व शुभेच्छापत्रे सादर करण्यात आली. यावेळी छत्रपती अवार्ड विजेते आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. शहरातील ७२ फुटबॉल संघांनी १४ मैदानात फुटबॉलचे कौशल्य दाखविले. जिल्हाभरात विविध मैदानांवर ४० हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविल्याची नोंद करण्यात आली. हरिहर मिश्रा, मिलोकसिंग चंदेल, दिनेश म्हाला, जे.के.चौधरी यांनी फुटबॉल सामने, मैदानांसह व्यवस्थेची जबाबदारी हाताळली. यावेळी महानगर क्रीडा संघटनेचे अजय आळशी, शिवदत्त ढवळे, अजय केवाळे, विजय मानकर, संदेश गिरी, सचिन देवळे, शरद गढीकर, निरंजन डाफ, दिलीप तिडके, हाफीज खान, नईम वकील अहमद, गजेंद्र अवघड, मंगेश व्यवहारे, अशोक श्रीवास, दिनेश देशमुख, प्रफुल्ल मेहता, मेहंदी अली, फसाटे सर, राजू पाटील आदींनी प्रयत्न केले. संचालन नितीन चव्हाळे तर .येथील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेनेही महाराष्ट्र मिशन वन मिलियन फुटबॉल उपक्रमातंर्गत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालक अर्चना नेरकर ,विद्यापीठाचे प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर उपस्थित होते.
अवघा जिल्हा झाला फुटबॉलमय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 21:45 IST
आॅक्टोबर महिन्यात ६ ते २४ दरम्यान भारतात आयोजित विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यानिमित्त जनजागृती करण्यासाठी.....
अवघा जिल्हा झाला फुटबॉलमय !
ठळक मुद्दे१,४०० मैदानांवर ४ हजार सामने : पालकमंत्र्याच्या ‘कीक’ने ‘मिशन’चा शुभारंभ