शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

निबंधक कार्यालय मूळ जागेत नेण्यास टाळाटाळ

By admin | Updated: November 16, 2014 22:43 IST

तहसील कार्यालय परिसरातील मूळ जागेत असलेले सहदुय्यम निबंधक कार्यालय सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तीन वर्षांपूर्वी परतवाडा मार्गावरील भाड्याच्या इमारतीत स्थानांतरित केल्याने

अचलपूर : तहसील कार्यालय परिसरातील मूळ जागेत असलेले सहदुय्यम निबंधक कार्यालय सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तीन वर्षांपूर्वी परतवाडा मार्गावरील भाड्याच्या इमारतीत स्थानांतरित केल्याने जनता त्रस्त झाली आहे. भाड्याचा करार संपून दीड महिना झाल्यावरही कार्यालय तेथेच आहे. कार्यालय पूर्वीच्या जागेत हलविण्यासाठी दुय्यम निबंधक अधिकारी चालढकल करीत असल्याचे दिसते. सहदुय्यम निबंधक कार्यालय स्थापन झाल्यापासून तहसील कार्यालय परिसरात होते. त्यामुळे ग्रामीण भागातून स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे काम सहज होत असे. मुद्रांक विक्रेते व लेखनिकांचे कार्यालयही तेथेच असल्याने सोय होती. परंतु हे कार्यालय तीन वर्षांपासून अचलपूर-परतवाडा मार्गावरील भाड्याच्या इमारतीतील स्थानांतरीत करण्यात आले. अचलपूर नगरपरिषद क्षेत्रातील नझूल शीट नंबर २३ प्लाट क्रमांक ८ मधील तुकडा नंबर १८ मध्ये आहे. याचे क्षेत्रफळ १ हजार चौरस फूट आहे. सुलभा रामकृष्ण वानखडे यांच्या मालकीची ही इमारत आहे. १ ंआॅक्टोबर २०११ पासून ते ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत तीन वर्षांकरिता हे कार्यालय भाडे करारावर घेण्यात आले होते. त्यावेळी हे कार्यालय तहसील कार्यालयातून स्थानांतरित करण्यासाठी आरपीआयचे (आठवले) तालुकाध्यक्ष विलास थोरात, गोविंद चरपटे, माजी सरपंच दिलीप राऊत, श्रीकांत तळोकार, फिरोजखान आदींनी विरोध केला होता. त्याविरोधात लेखी निवेदनही दिले होते. हा विरोध डावलून हे कार्यालय भाड्याच्या इमारतीत हलविण्यात आले होते. एका मुद्रांक विक्रेत्याच्या आग्रहाखातर या कार्यालयाचे स्थानांतरण करण्यात आल्याची चर्चा त्यावेळी होती.आधीच दलालांच्या विळख्यात असलेले कार्यालय तहसील कार्यालय परिसरातून भाड्याच्या इमारतीत गेल्यावर दलालांचा राबता वाढला. परिणामी आतापर्यंत कधीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात न अडकलेले तीन महिन्यांपूर्वी अलगद सापडले. आठ दिवस येथील भ्रष्टाचार थांबला. परंतु गेल्या काही दिवसांपासून या कार्यालयात पुन्हा दलालांची राबता वाढला आहे. हे कार्यालय मूळ जागेत स्थानांतरित करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे स्पष्ट चित्र आहे. भाडेकरार संपल्याने आता हे कार्यालय पुन्हा जुन्या जागी हलवावे, अशी मागणी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)