शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या अंगावर कार चढविण्याचा प्रयत्न; माजी आमदारपुत्राविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:08 IST

राजकुमार पटेलांसह ४०० जणांविरुद्ध फौजदारी : मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा/अमरावती : कर्तव्यावरील पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदारपुत्र तथा धारणी बाजार समितीचे सभापती रोहित राजकुमार पटेल याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चिखलदरा पोलिसांनी गुरुवारी दुपारी माजी आमदार राजकुमार पटेल, मन्ना दारसिंबे, सुनील उईके, रघुवीर सतवासे, गणेश बेठेकर, देवीदास कोगे व त्यांच्या ३०० ते ४०० सहकाऱ्यांविरुद्ध बेकायदेशीररीत्या रास्ता रोको, सार्वजनिक वाहतूक अडवणे व मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल केलेत.

चिखलदरा तालुक्यातील नागापूरस्थित वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा येथे २९ जुलै रोजी पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडल्यामुळे त्या शाळेतील १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ३० जुलै रोजी त्या मुलीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पार्थिव मुलीच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. 

प्रेत अंत्यसंस्कारासाठी मुलीच्या मूळ गावी गांगरखेडा येथे न नेता ते धारणी प्रकल्प अधिकारी कार्यालयात नेऊन मृत मुलीच्या परिवारास जोपर्यंत ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत तिचे प्रेत प्रकल्प अधिकारी कार्यालयातच ठेवून आंदोलन करणार, अशी भूमिका माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा रोहित यांनी घेतली.

पोलिसांशी हुज्जतबुधवारी राजकुमार पटेल, रोहित पटेल व इतरांनी घटांग टी-पॉइंट येथे विनापरवानगी सार्वजनिक रस्ता अडवून मुलीचे प्रेत रस्त्यावर ठेवले. प्रकल्प अधिकारी कार्यालयात जाऊ द्या; अन्यथा आम्ही प्रेत घेऊन इथेच बसतो, असे म्हणत पोलिसांशी हुज्जत घातली. रास्तारोको केला.थोड्या वेळाने राजकुमार पटेल हे त्यांच्या सहकाऱ्यांसह मुलीचे प्रेत हातात घेऊन धारणी रोडने धावत निघाले. ते प्रेत रोहित पटेल चालवत असलेल्या वाहनात ठेवले तथा धारणीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला.

रोहित पटेलला अटकएफआयआरनुसार, रोहित पटेल याने त्याची कार जीव घेण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न केला. ते वाहन पुढे रोरा फाट्याजवळ पोलिसांनी थांबविले. त्यानंतर पोलिसांनी राजकुमार पटेल व रोहित पटेल यांना ताब्यात घेऊन त्यांना चिखलदरा ठाण्यात आणले. गुरुवारी गंगारखेडा येथे त्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी दुपारी गुन्हा दाखल केल्यानंतर रोहित पटेल याला गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर राजकुमार पटेल यांना रुग्णालयात हलविण्यात आले.

टॅग्स :Amravatiअमरावती