शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जामिनासाठी जाणा-या आरोपींच्या वाहनावर हल्ला, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 16:53 IST

वरूड  नजीकच्या सावंगा येथे ग्रामपंचायतच्या आमसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये मारहाणीच्या घटनेतील आरोपी जामिनासाठी जात  असताना त्यांचे चारचाकी वाहन क्षुल्लक कारणाहून फोडण्यात आले. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली.

अमरावती -  वरूड  नजीकच्या सावंगा येथे ग्रामपंचायतच्या आमसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये मारहाणीच्या घटनेतील आरोपी जामिनासाठी जात  असताना त्यांचे चारचाकी वाहन क्षुल्लक कारणाहून फोडण्यात आले. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी बनोडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. 

प्राप्त माहितीनुसार, सावंगा येथे ३० जानेवारीला ग्रामपंचायतीची आमसभा झाली. यात सत्ताधारी-विरोधकांमध्ये मारहाण झाली. विरोधकांवर अ‍ॅट्रॉसिटी अन्वये कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील आठ आरोपी जामीन मिळविण्यासाठी एमएच २७ एआर ८४५९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने वरूड येथे जात होते. त्याचवेळी अक्षय संजय निकम (२२) हा मेंढ्यांचा कळप घेऊन जात होता. त्यातील एका मेंढीला वाहनाचा धक्का लागला. यावरून अक्षय निकम याने गाडीच्या काचावर बुक्की मारली व कुºहाडीने काचा फोडल्या. यात रमेश गुलाब बल्लार (५२) व सुरेश नारायण टेकोडे (५०) हे दोघे जखमी झाले. घटनेनंतर बनोडा पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. अक्षय निकम यांच्या तक्रारीवरून मनीष पुरुषोत्तम टेंभे यांच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ४२९ अन्वये गुन्हा दाखल केले, तर मनीष टेंभे यांच्या तक्रारीवरुन अक्षय संजय निकम याच्याविरुध्द भादविचे कलम ३३६, ५०४, ५०६, ३२३, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला. बेनोड्याचे ठाणेदार शांतीकुमार पाटील पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाAmravatiअमरावती