शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आशिया स्पोर्टस चॅम्पियनशिप; मेळघाटच्या गोकुलची सोनेरी कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 17:19 IST

दारिद्र्य, कुपोषण आणि मागास भागाचा शिक्का असलेल्या मेळघाटातील आदिवासीबहुल राहू या छोट्याशा गावातील गोकुल राघो येवले या युवकाने आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याच्या या कामगिरीने सर्वांना अचंबित केले आहे.

ठळक मुद्दे१०० मीटर व २०० मीटर शर्यतीत दोन सुवर्णपदके

मारुती पाटणकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दारिद्र्य, कुपोषण आणि मागास भागाचा शिक्का असलेल्या मेळघाटातील आदिवासीबहुल राहू या छोट्याशा गावातील गोकुल राघो येवले या युवकाने आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याच्या या कामगिरीने सर्वांना अचंबित केले आहे.काठमांडू येथे २३ व २४ नोव्हेंबरला आशिया स्पोर्टस चॅम्पियनशिप पार पडली. यामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत गोकुल राघो येवले (२३) याने १०० व २०० मीटर शर्यतीत दोन सुवर्णपदकांची कमाई केली.राहू येथीलच जि.प. शाळेतील शिक्षक पवन बोके यांनी गोकुलला योग्य मार्गदर्शन करून त्याला विविध स्पर्धांमधे सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले. खेळासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने त्याने अमरावती येथे राहून सराव केला. मुंबई येथील स्पोर्ट अथॉरिटी आॅफ इंडियाने घेतलेल्या चाचणीत गोकुलने प्रावीण्य प्राप्त केल्यावर त्याची काठमांडू येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. ही निवड सार्थ ठरवित गोकुलने दोन सुवर्णपदकांची कमाई केली.शिक्षक ते मेंटॉरशिक्षक पवन बोके यांची कामगिरीदेखील थक्क करणारी आहे. राहू येथील लोकांची शिक्षणाबद्दल अनास्था दूर करीत त्यांनी दोन वर्षांत गावातील सहा तरुणांना शासकीय नोकरी मिळविण्याचा मार्ग दाखविला. क्रीडाक्षेत्रातही लक्ष घालून गोकुलसारखा खेळाडू घडविला. त्यांची याच वर्षी बदली धामणगाव येथे बदली झाली. तेथूनच ते गोकुलला मार्गदर्शन देत असतात.

टॅग्स :Melghatमेळघाट