शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा असुरक्षित

By admin | Updated: July 19, 2016 23:56 IST

आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत सुरु असलेल्या जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळांची परिस्थिती विदारकच आहे.

राजकीय हस्तक्षेप : स्वच्छतेचे तीनतेरा, अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्षअमरावती : आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत सुरु असलेल्या जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळांची परिस्थिती विदारकच आहे. या सर्व आश्रमशाळांवर राजकीय पुढाऱ्यांची मक्तेदारी आहे. भोजन कंत्राटापासून तर विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठा करेपर्यत राजकीय हस्तक्षेपामुळे निकृष्ट दर्जा हा आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाचवीला पुजला आहे. संरक्षण भिंतींचा अभाव, कालबाह्य इमारती, वर्षानुवर्षांपासून इमारतींची रखडलेली डागडुजी, स्वच्छतेचे तिनतेरा, जंगलाशेजारी असलेल्या इमारती, कधी मुख्याध्यापक गायब तर कधी शिक्षकांचा पत्ता नाही, अशा स्थितीत आश्रमशाळा चालविल्या जातात. जिल्ह्यात एकुण ३३ आश्रमशाळा आहेत. शासनाकडून आश्रमशाळांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी आदिवासी व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना फारशा सुविधा मिळत नाहीत. अनुदानित आश्रमशाळा या अपहाराचे कुरण बनल्या आहेत. जिल्ह्यात एक, दोन आश्रमशाळा वगळता अन्य आश्रमशाळांना संरक्षण भिंत नसल्याचे वास्तव आहे. आश्रमशाळांवर राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याने त्यांना सतत अभय मिळत असल्याची माहिती आहे. बऱ्याच आश्रमशाळांना संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थी असुरक्षिततेच्या सावटात शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमध्ये मूलभूत आणि पायाभूत सुविधांची वानवा ही नित्याचीच बाब आहे. (प्रतिनिधी)समाजकल्याणच्या १३ आश्रमशाळासमाजकल्याण विभागाच्या जिल्ह्यात १३ आश्रमशाळा आहेत. यापैकी बहुतांश आश्रमशाळा या राजकीय पुढाऱ्यांच्या आहेत. अनुदान लाटण्यासाठी जणू आश्रमशाळा सुरु असल्याचे चित्र आहे. अचलपूर, मोर्शी, तिवसा, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार तर अमरावतीनजिकच्या बहिलोलपूर येथे आश्रमशाळा सुरु आहे. या सर्व आश्रमशाळा खासगी संस्थेमार्फत चालविल्या जातात. संरक्षण भिंती नसल्याची अनेक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची ओरड आहे.आदिवासी विकास विभागाच्या २० आश्रमशाळाआदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना नरकयातना सहन करुन शिक्षण घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्याभरात आहे. यापूर्वी २७ आश्रमशाळा सुरु होत्या. मात्र सात आश्रमशाळा बंद करण्यात आल्यात. तूर्तास आदिवासी मुला- मुलीसांठी २० आश्रमशाळा चालविल्या जातात. दुर्गम भाग तसेच जंगलाशेजारी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविल्या जातात. धारणी, चिखलदरा तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक आश्रमशाळा आहेत. अमरावती शहरात कठोरा परिसरात आश्रमशाळा सुरु आहे. चांदुररेल्वे, बिरोटी येथे सुद्धा आश्रमशाळा चालविल्या जातात.