शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

पूर्व वैमनस्यातून दोन गटांत सशस्त्र चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:58 IST

डिप्टी ग्राऊंडमधील दगडफेक व तलवारी उगारण्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच बुधवारी रात्री १२ नंतर नूरानी चौकात दोन गटांत सशस्त्र चकमक उडाली. प्रचंड दगडफेक करण्यात आली. या चकमकीत एक जण गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देएक गंभीर : कारची तोडफोड; नूरानी चौक बनले पोलीस छावणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डिप्टी ग्राऊंडमधील दगडफेक व तलवारी उगारण्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच बुधवारी रात्री १२ नंतर नूरानी चौकात दोन गटांत सशस्त्र चकमक उडाली. प्रचंड दगडफेक करण्यात आली. या चकमकीत एक जण गंभीर जखमी झाला. या चकमकीदरम्यान एका चारचाकी वाहनाची नासधूस करण्यात आली. पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, परस्परविरोधी तक्रारींवरून दोन गटांतील १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रानुसार, सन २०१४ मध्ये झालेल्या एका हत्याप्रकरणाची गुरुवारी स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार होती. या प्रकरणात मो. रशीद शाह हा साक्षीदार आहे. तो बुधवारी रात्री हैदरपुरा येथील घरानजीक एका पानटपरीवर असताना त्यास धमकावण्यात आले. यावेळी झडलेल्या वादादरम्यान अब्दुल सलीम व अब्दुल हबीब या दोघांनी रशीदच्या डोक्यावर पाइपने वार केला तसेच घराच्या दारावर तलवार मारली. दोन गट समोरासमोर ठाकले. सुमारे अर्धा तास दगडफेक करण्यात आली. या घटनेने अफरातफर माजली. जखमी रशीद शाहला तत्काळ इर्विनला हलविण्यात आले.बघ्यांपैकी कुणीतरी घटनेची माहिती नागपुरीगेट पोलिसांना दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक व क्यूआरटी पथक तैनात करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही गटांतील प्रत्येकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अ. हबीब, अ. नईम, अ. सलीम, अनिस ऊर्फ अन्नूसह दुसऱ्या गटातील सोनू शाह, मोनू शाह, हाजी रफिक शाह यांचा समावेश आहे. यादरम्यान नूराणी चौक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एसआरपीएफ व अन्य ठाण्यांतील कुमक बोलावण्यात आली. दोन्ही उपायुक्तांसह ठाणेदारांनी घटनास्थळी भेट दिली. रशीदच्या चारचाकीची तोडफोड केली असून, पोलिसांनी तलवार व फरशा जप्त केला. १९ जणांविरुद्ध कलम १४७, १४८, १४९, ४५२, ३२६ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.सर्च आॅपरेशनयाप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली. अन्य आरोपींच्या शोधार्थ हैदरपुरा व नजीकच्या परिसरात बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभर सर्च आॅपरेशन राबविण्यात आले. गुरुवारी दिवसभर हैदरपुरा व नूरानी चौक परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप होते.सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली.- दिलीप चव्हाण, ठाणेदार नागपुरी गेट पोलीस ठाणे

टॅग्स :Policeपोलिस