शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
4
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
5
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
6
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
7
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
8
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
9
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
10
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
11
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
12
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
13
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
14
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
15
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
16
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
17
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
18
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
19
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
20
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
Daily Top 2Weekly Top 5

हुक्कापार्लर्सला चाप; सीपींनी जपले समाजभान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 21:56 IST

ऐतिहासिक, पुरातन, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबानगरीला ‘हुक्कापार्लर’ संस्कृतीचे गालबोट लावणाºया समाजकंटकांविरूद्ध मोहीम उघडून .....

ठळक मुद्देअमरावतीकरांना दिलासा : दिशाहीन होणाºया तरूणाईला सावरले, सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडूनही दखल

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऐतिहासिक, पुरातन, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबानगरीला ‘हुक्कापार्लर’ संस्कृतीचे गालबोट लावणाºया समाजकंटकांविरूद्ध मोहीम उघडून शहर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी जपलेले समाजभान आणि नकळत व्यसनाधिनतेकडे झुकणाºया तरूणाईला सावरण्याचा केलेला प्रयत्न खरोखरीच कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे. चोरवाटांनी अमरावती शहरात पाय रोवणारी ही ‘हुक्कापार्लर’ संस्कृती नष्ट करण्याचे धारिष्ट्य दाखविणाºया सीपींना म्हणूनच सुजाण अमरावतीकर ‘सॅल्यूट’करीत आहेत.मागील काही वर्षांत सुसंस्कृत व अध्यात्मपीठ असलेल्या अमरावती शहरात छुप्या मार्गाने हुक्कापब उघडले गेले. मुंबई-पुण्याची ही घातक संस्कृती शहरातील तरूणाईला नकळत दिशाहिन करू लागली होती. संस्कारांना फाटा देऊन सायंकाळी या हुक्कापार्लर्समध्ये एकत्र येणारे तरूण-तरूणी आणि तेथे चालणारे गैरप्रकार अत्यंत घातक होते. देशाचा आधारस्तंभ असल्याची भावी पिढी या संस्कृतीमुळे गारद होण्याच्या मार्गावर होेती. हा धोका ओळखून सीपींनी या अश्लाघ्य संस्कृतीविरूद्ध कंबर कसली. त्यांनी हुक्कापार्लर्सविरूद्ध धडाकेबाज मोहीम उघडली. त्यासाठी त्यांनी विधी अधिकारी विश्वास वैद्य यांचा सल्ला घेतला आणि मग या निर्ढावलेल्या हुक्कापार्लर्सच्या संचालकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला.सीपींनी राबविलेल्या धाडसत्रांनंतर बाहेर आलेली माहिती अतिशय धक्कादायक होती. कोणत्याच हुक्कापार्लरच्या संचालकांनी कायदेशिर मार्गाने व नियमांच्या अधिन राहून हा व्यवसाय सुरू केलेला नाही, हे दिसून आले. या हुक्कापार्लर्समध्ये तंबाखूजन्य पदार्थांसोबतच गांजा व अंमली पदार्थांच्या उपयोगाची शक्यताही समोर आली. हुक्कापार्लर्सच्या आड तरूणींचे लैंगिक शोषण व ब्लॅकमेलिंगची दाट शक्यताही सीपींनी वर्तविली होती. हुक्का पार्लरसंबंधाने सहाय्यक आयुक्त कार्यालयाने सुद्धा परवाने रद्द केले आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन दोन हुक्का पार्लर संचालकांवर गुन्हे नोंदविले आहेत.काय म्हणतोे कायदाकोटपा कायदा व प्रोव्हिबिशन आॅफ स्मोकिंंग पब्लीक प्लेस रूल २००८ नुसार हुक्का पार्लरला परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, त्या इमारतीची यांत्रिकी रचना नियमांप्रमाणे असावी लागते. महापालिकेकडून रितसर परवानगी घेताना हुक्का पार्लरची इमारत नियमात बसते की नाही, याची शहानिशा करावी लागते. मात्र, शहरातील एकाही हुक्कापार्लरची इमारत नियमांचे पालन करून बांधली नसल्याचे पोलिसांना आढळून आले. स्मोकिंग रूमची रचना नियमाप्रमाणे असणे आवश्यक आहे. मात्र, तसे कोठेही आढळून आले नाही.कोटपा कायद्यानुसार शाळा-महाविद्यालयापासून १०० यार्ड म्हणजे साधारणत: १ किलोमीटर अंतरावर हुक्कापार्लर्ससाठी परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, विद्यापीठासमोरील मार्गावर असलेल्या संस्कार लॉनमध्ये नियम डावलून हुक्कापार्लर सुरू होेते.पोलिसांनी शहरातील सात हुक्कापार्लर्स बंद केले आहेत. याधाडसत्रानंतर संबंधित व्यावसायिकांनी विनापरवाना हुक्का पार्लर चालविले. आईस्क्रिम पार्लर, पिझ्झा सेंटर व रेस्टॉरेंटच्या नावाखाली हुक्कापार्लर्स चालविल्याचे समोर आले आहे. हुक्क्याचा धूर बाहेर निघावा, यासाठी व्हेंटिलेशनची सोय एकाही ठिकाणी आढळून आली नाही.पालक झाले निर्धास्ततारूण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणारी आपली मुले वाईट वळणाला जाऊ नयेत, याची चिंता सतत पालकांना असते. हुक्कापार्लर्समुळे तरूणाई दिशाहीन होत असल्याचे पालकांना जाणवत होते. सीपींनी पालकांची ही व्यथा नेमकी हेरली आणि हुक्कापार्लर्सवर धाडसत्र राबविले. यामुळे पालक निर्धास्त झाले आहेत. हुक्कापार्लसमधून व्यसनाधिनता वाढण्यासोबतच गुन्हेगारी वाढण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. सीपींनी पालकांना दिलासा दिला आहे.हुक्का पार्लरमुळे अमरावतीच्या संस्कृतीला गालबोट लागले होते. पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाईचा सपाटा चालविल्याची बाब अमरावतीकरांसाठी भुषणावहच आहे.- राजेश जगताप, पालकहुक्का पार्लर आड अवैध व्यवसाय व गुन्हेगारी वाढण्याची दाट शक्यता असते. समाजावर विपरित परिणाम होते. पोलीस कारवाईमुळे अमरावतीतून ही संस्कृती रुजू होण्यापूर्वीच नष्ट होत असल्याची बाब कौतुकास्पद आहे.- रोहन गुप्ता, पालक.भारतीय संस्कुतीनुसार नवीन पिढी घडविण्याचे प्रथम काम पालकांचे असून त्यानंतर शिक्षकांनी मुलांना चांगले वळण लावणे गरजेचे आहे. हुक्का पार्लर हे समाजावर घातक परिणाम करते. पोलिसांनी हुक्का पार्लरवर कारवाई केल्यामुळे समाजाला चांगली दिशा मिळत आहे.- मयुराताई देशमुख, उपाध्यक्ष, केंद्रीय जिजाऊ ब्रिगेडआमच्या संघटनेकडून हुक्का पार्लर संस्कृतीला विरोध केला. कायदा हाती घेतला नाही. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य बजावले हीच बाब आमच्यासाठी व समाजासाठी प्रेरणादायी आहे.- निरजंन दुबे, महानगर संयोजक, बजरंग दल.