शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

अन् एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णाने घेतला पोलिसाच्या हाताला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने एका आरोपी रुग्णाचे दोन्ही हात पकडले असता, त्याने ४० वर्षीय ...

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने एका आरोपी रुग्णाचे दोन्ही हात पकडले असता, त्याने ४० वर्षीय पोलिसाच्या हाताला चावा घेतला. सदर रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात असल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर सदर पोलीस शिपाई यांचीही एचआयव्ही चाचणी करण्यात आली. सदर चाचणी निगेटिव्ह असल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना १५ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी घडली. याप्रकरणी आरोपी रुग्णाविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविला.

पोलीससूत्रानुसार, १२ जानेवारीपासून वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये फिर्यादी कर्तव्यावर होते. तेथे उपचारार्थ आलेल्या मोर्शी तालुक्यातील एका इसमाचे उपचार करताना पोलिसाने डॉक्टरांच्या सांगण्यावरून दोन्ही हात पकडले असता, त्याने पोलिसाच्या हाताला चावा घेतला. मात्र, त्यानंतर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, आरोपी हा एचआव्ही पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर मात्र एकच धावपळ झाली. सिटी कोतवाली ठाण्यात कार्यरत सदर पोलिसाची सदर डाॅक्टरांनी एचआयव्ही चाचणी केली. त्याचा चाचणी अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. तसे प्रमाणपत्रही डॉक्टरांनी दिले आहे. पोलीस उपायुक्तांच्या अहवालनंतर सदर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.