शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

४०४१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचा ‘आगाज’, बक्षिसांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 18:53 IST

देशभरातील ४०४१ शहरांमध्ये ४ जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे. चार हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल येण्यासाठी शहरांमध्ये चुरस असून, सिटिझन फीडबॅकवर गुणांकन असल्याने सर्वसामान्य नागरिकच स्वत:चे शहर ‘स्वच्छ’ ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

 प्रदीप भाकरे

अमरावती - देशभरातील ४०४१ शहरांमध्ये ४ जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे. चार हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल येण्यासाठी शहरांमध्ये चुरस असून, सिटिझन फीडबॅकवर गुणांकन असल्याने सर्वसामान्य नागरिकच स्वत:चे शहर ‘स्वच्छ’ ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ सर्वेक्षणाचे हे चौथे वर्ष असून सहभागी शहरांची संख्या तब्बल ४०४१ वर पोहोचली आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या क्वालिटी काऊंन्सिल ऑफ इंडियाची त्यासाठी नेमणूक करण्यात आली असून, या ‘क्यूसीआय’ने नेमलेल्या असेसर्सच्या पाहणीनंतर अंतिम गुणांकन होणार आहे.‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ ही परीक्षा चार हजार गुणांची असून, त्यात सेवास्तर प्रगती व नागरिकांच्या अभिप्रायासाठी प्रत्येकी १४००, तर थेट निरीक्षण या विभागासाठी १२०० गुण आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये महाराष्ट्रातील सर्व शहरांची कामगिरी उच्चतम होण्यासाठी राज्य सरकारने बक्षीसही घोषित केले आहे.

समाजातील सर्व घटकांतील लोकांचा सांघिक सहभाग वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणातील ४०४१ शहरे ‘अमृत’ व ‘नॉन अमृत’ अशा दोन गटांत विभागण्यात आले आहेत. अमृत शहरांचा गुणानुक्रम हा देशपातळीवरील ५०० शहरांमधून करण्यात येईल. यात राज्यातील ४३ शहरांचा समावेश आहे. नॉन अमृत शहरांची विभागणी पाच विभागांमध्ये करण्यात आली आहे. यात महाराष्ट्राचा समावेश पश्चिम विभागात आहे. ४ जानेवारीपासून सुरू झालेले स्वच्छ सर्वेक्षण १० मार्चपर्यंत चालणार आहे. त्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत