लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : येथील जुने बस स्थानकाकडून सायकलने जात असलेल्या मुलाला कांद्याने भरलेल्या ट्रकने चिरडले. यात त्या १४ वर्षीय मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुख्य रस्त्यावर ट्रक रिव्हर्स घेत असताना, मागील चाकात आल्याने हा अपघात घडला. १५ जून रोजी दुपारी ही घटना घडली. अमन संजय रेखाते असे मृत मुलाचे नाव आहे.अमन रेखाते हा शिवभोजन थाळी केंद्रातून जेवण करून निघाला. अंजनगाव अकोट रोडवरील जुन्या बस स्थानकावर श्रीराम ऑटोमोबाईलसमोर कांद्याने भरलेला एमएच २७ बीएक्स ४५५५ क्रमांकाचा पथ्रोट येथील ट्रक मागे येत होता. अमन ट्रकच्या मागील चाकात आला. चालक गणेश मारुती शनिवारे (परसापूर) याला अटक करण्यात आली. अमन हा यंदा पंचफुलाबाई हरणे विद्यालयात इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. नुकतेच त्याने सहा तास चालणारे व भरपूर प्रकाश देणारे इन्व्हर्टर तयार केले होते. त्याला इंजिनीअर व्हायचे होते. त्याने कोरोनावर एक कविता लिहिली होती. त्याच्या आकस्मिक मृत्यूने त्याचे आई-वडील व पाचव्या वर्गात असणारा लहान भाऊ शोकविव्हळ झाले आहेत.
अंजनगाव सुर्जीत ट्रकने सायकलस्वार मुलास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST
ऑटोमोबाईलसमोर कांद्याने भरलेला एमएच २७ बीएक्स ४५५५ क्रमांकाचा पथ्रोट येथील ट्रक मागे येत होता. अमन ट्रकच्या मागील चाकात आला. चालक गणेश मारुती शनिवारे (परसापूर) याला अटक करण्यात आली. अमन हा यंदा पंचफुलाबाई हरणे विद्यालयात इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. नुकतेच त्याने सहा तास चालणारे व भरपूर प्रकाश देणारे इन्व्हर्टर तयार केले होते.
अंजनगाव सुर्जीत ट्रकने सायकलस्वार मुलास चिरडले
ठळक मुद्देघटनास्थळीच मृत्यू : 'त्याला' अभियंता व्हायचे होते...