सुदेश मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : राष्ट्रीय महामार्ग ४८ व महामार्ग क्रमांक ४८ या दोन महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा नवा प्रस्तावित महामार्ग अमरावती जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण शहरांना जोडला जाणार असल्याने येथे विकासाची नवी उमेद दिसू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, परतवाडा ही मोठी शहरे, तर अनेक गावे राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर येणार आहे.या नवीन राष्टÑीय महामार्गाला ‘५४८ क’ हा क्रमांक देण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या राजपत्रात जानेवारी २०१७ मध्ये याची अधिसूचना प्रसिद्ध झाली. या नव्या महामार्गाचे काम शहरात जोरात सुरू झाले आहे. या मार्गावर दररोज किती वाहने धावतात? जड वाहनांचा भार व संख्या, पूल व रस्त्यांची भौगोलिक स्थिती याचे प्राथमिक सर्वेक्षण दोन महिन्यांपर्यंत चालणार आहे. उल्लेखनीय असे की, संपूर्ण मागील डांबरीकरणाऐवजी प्रिमिक्स काँक्रीट वापरले जाणार आहे. त्यादृष्टीने कंपनीने तीनशे टन क्षमतेचा प्लांट अकोट मार्गावर स्थापन केला आहे.कोरेगाव सातारापासून म्हसवड, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, टेंभुर्णी, कुर्डुवाडी, बार्शी, उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळ, कळंब, पुढे बीड जिल्ह्यातील केज, धारू, वडवणी, माजलगाव, त्यापुढे दारुर, जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा व बुलडाणा जिल्ह्यातील लोणार, मेहकर, जानेफळ ते खामगावपर्यंत व तेथून शेगाव मार्गे देवरी-अकोट, अंजनगाव, परतवाडा, बहीरम ते बैतूल असा नवा राजमार्ग आहे. संपूर्ण मार्ग अंदाजे शंभर फुटांचा राहील.शहरातील मालमत्तेचे नुकसान !विभाजकाच्या एका बाजूने ५० फूट जागा द्यावयाच्या या महामार्गाच्या चालू झालेल्या कामामुळे या मार्गावरील अनेक घरांची पडझड निश्चित आहे. नव्या आणि जुन्या बसस्थानकावरील मालमत्तासुद्धा या महामार्गाच्या तडाख्यात आल्या आहेत.शहानूरच्या पुलाची उंची वाढणार !अंजनगावातून जाणाºया शहानूर नदीच्या पुलाची उंची नव्या महामार्गावर वाढणार असल्याने या पुलाच्या विद्यमान अवस्थेची समिक्षा झाली असून सध्याचे तहसीलदारांचे क्वॉर्टर ज्या उंचावर आहे, त्याला अनुरूप सरळ रेषेत जुन्या बसस्थानकानजीकच्या रस्त्यावर हा नवा पूल उभारला जाणार आहे.
राष्टÑीय महामार्गाच्या नकाशावर अंजनगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 22:57 IST
राष्ट्रीय महामार्ग ४८ व महामार्ग क्रमांक ४८ या दोन महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा नवा प्रस्तावित महामार्ग अमरावती जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण शहरांना जोडला जाणार असल्याने
राष्टÑीय महामार्गाच्या नकाशावर अंजनगाव
ठळक मुद्देनवा राष्ट्रीय महामार्गनागरिकांना सुविधाबाजारपेठ फुलणार