शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचे वेतन आॅनलाईन

By admin | Updated: January 12, 2016 00:09 IST

थकीत पगारवाढीसाठी अनेक वर्षांपासून शासन दरबारी लढणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे वेतन आता दरमहा १ तारखेला होणार आहे.

नव्या वर्षाची नवी भेट जितेंद्र दखने  अमरावतीथकीत पगारवाढीसाठी अनेक वर्षांपासून शासन दरबारी लढणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे वेतन आता दरमहा १ तारखेला होणार आहे. याशिवाय यापूर्वीचे त्यांचे थकीत वेतनही लवकरच देण्यात येणार आहे. यापुढे कोणाचाही पगार थकित राहू नये, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ हजार ४६३ अंगणवाडी सेविका आणि २ हजार ४२७ मदतनिस आणि १४० मिनी अंगणवाडी सेविका या निर्णयाने लाभान्वित होतील. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन वर्ष लाभदायी ठरेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. थकीत मानधनासाठी अंगणवाडी सेविकांचा शासन दरबारी लढा सुरू होता. लवकरच होणार अंमलबजावणीअमरावती : यावर तोडगा म्हणून मुंबई आयुक्तालयातून आता आॅनलाईन कार्यप्रणालीवर भर देण्यात आला आहे. याशिवाय मानधन प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. दरमहा १ तारखेलाच. त्यासाठी प्रत्येक सेविका व मदतनिसांच्या मोबाईलवर ‘एसएमएस’ही केला जाईल. त्यासाठी अधिकारी, कर्मचारी विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन माहिती संकलित करीत आहेत. याच पथकातील वित्त व लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना मागदर्शन केले आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ५०० अंगणवाड्यांमध्ये एकूण २हजार ६०३ अंगणवाडी सेविका आणि २४२७ मदतनिस कार्यरत आहेत. अधिकाऱ्यांना मिळेल माहितीप्रत्येक विभागातील जिल्हा, तालुका गावस्तरावरील प्रकल्पावर कोणती अंगणवाडी सेविका अथवा मदतनिस कार्यरत आहे, त्या किती दिवस हजर अथवा गैरहजर होत्या, यासह सेवा ज्येष्ठतेवरुन त्यांची पगारवाढ, आजवर केलेली उत्कृष्ट सेवा, पगार पत्रकातील त्रुटी आणि त्रुटींच्या केलेल्या पूर्ततेची माहिती आॅनलाईन पध्दतीने संबंधित अधिकाऱ्यांना मिळेल. पारंपरिक पद्धतयापूर्वी शासनाकडून वेतनाचा निधी हा संबंधित विभागाकडे येत होता. त्यानंतर तो जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित होत असे. पश्चात त्याचे जिल्हाभरातील प्रकल्पांना वितरण केले जात असे. या प्रक्रियेला बराच कालावधी लागत होता. तसेच या शुंखलेत कागदपत्रांची कमतरता राहिल्यास अंगणवाडी सेविकांना त्रास होत होता. नवीन संगणकीय पध्दत लवकरच सुरु होणार आहे. याबाबत सर्वत्र काम सुरू झाले आहे. आॅनलाईन पध्दतीने संपूर्ण माहिती कशी भरावी, यासह इतर बाबींचे मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी योग्य ती माहितीही घेण्यात आली आहे.लवकरच ही प्रक्रिया अंमलात येईल.-कै लास घोडके, डेप्युटी सीईओ, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद