शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपुरातील आंध्रा बँकेच्या आॅडिटरला अमरावतीत अटक, ९८ लाखांचे फसवणूक प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 18:23 IST

बनावट दस्तऐवजाद्वारे ९८ लाखांचे कर्ज मंजूर करताना वरिष्ठांकडे सकारात्मक अहवाल पाठविणा-या आंध्रा बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकाला अमरावती पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. यादव पंढरी निखारे (४९, रा. रामकृष्ण सोसायटी, नरेंद्रनगर, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे.

अमरावती : बनावट दस्तऐवजाद्वारे ९८ लाखांचे कर्ज मंजूर करताना वरिष्ठांकडे सकारात्मक अहवाल पाठविणा-या आंध्रा बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकाला अमरावती पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. यादव पंढरी निखारे (४९, रा. रामकृष्ण सोसायटी, नरेंद्रनगर, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. यादव निखारे सद्यस्थितीत बँकेत नागपूर येथे आॅडिटर आहे.      यादव निखारे २०१६ मध्ये आंध्रा बँकेच्या अमरावती येथे इर्विन चौक शाखेत व्यवस्थापक होता. त्यावेळी आकाश शिरभाते (४५, रा. विलासनगर) याने आई करुणा शिरभाते, रवींद्र गंद्रे, रोहन भोपळे यांना सोबत घेऊन चिंतामणी प्रिंटिंग प्रेसच्या नावाखाली प्रुडंट कंपनीकडून मशिनरी खरेदी करण्यासाठी आंध्रा बँकेतून ९८ लाखांचे बनावट दस्तऐवजावरून कर्ज घेतले होते. हा प्रकार बँक व्यवस्थापनाच्या निदर्शनास आल्यावर २७ जुलै २०१६ रोजी आंध्रा बँकेचे शाखाधिकारी फणी लक्ष्मीकांत शास्त्री पशुपर्ती (३०) यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी वरील चौघांविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४७१, १२०(ब), ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. आकाश शिरभातेला अटक केली, तर त्याची आई करुणा शिरभाते यांनी अटकपूर्व जामीन मिळविला होता. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यावर पोलिसांनी रवींद्र गंद्रे व रोहन भोपळे यांना अटक केली. सद्यस्थितीत ते जामिनावर बाहेर आहेत.दरम्यान, पोलीस चौकशीत तत्कालीन बँक व्यवस्थापक यादव निखारेचाही सहभाग असल्याचे पुढे आले. बनावट कोटेशन व संपत्तीचे बनावट दस्ताऐवज सादर केले असतानाही निखारे याने वरिष्ठांकडे सकारात्मक अहवाल पाठवून ९८ लाखांचे कर्ज दिल्याचे निदर्शनास आले. त्याआधारे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अतुल वर, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस कर्मचारी राजेंद्र शेंडे, ईश्वर चक्रे व शैलेश रोंघे यांनी निखारे याला कॅम्प परिसरातून अटक केली. निखारेला शुक्रवारी दुपारी अमरावती न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. एक कोटीच्या फ्रॉडमध्ये अटकपूर्व जामीनयादव निखारेकडे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथील कामांची जबाबदारी आहे. अमरावतीत व्यवस्थापक असताना १ कोटी ४ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणातही तो आरोपी आहे. त्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळविला आहे. २ ते १० टक्के कमिशन कर्जवाटप करताना निखारे २ ते १० टक्क्यांपर्यंत कमिशन घेत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. कर्जाच्या रकमेवर कमिशन अवलंबून राहायचे. पीआय अणेंची टाळाटाळपोलीस निरीक्षक गणेश अणे हे आर्थिक गुन्हे शाखेत असताना त्यांच्याकडे या फसवणूक प्रकरणाचा तपास होता. मात्र, त्यांनी आरोपीस अटक करण्याबाबत टाळाटाळ केली होती, असा खुलासा पोलीस आयुक्तांनी माध्यमासमोर केला.  जन्मठेपेची तरतूदलोकसेवक अथवा बँक व्यावसायिक किंवा एजन्ट यांनी फौजदारीस पात्र न्यासभंग केल्यास, त्यांना आजन्म किंवा दहा वर्षांच्या कारावासाची तरतूद कायद्यात आहे. बँक अधिका-यांना दिला होता इशारापोलीस आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी बँक अधिका-यांना कारभार सुधारण्याविषयी अधिका-यांना सूचना व सक्त ताकीद दिली. यानंतर शुक्रवारी यादव निखारेला अटक करण्यात आली. पुढेही बँकेच्या फसवणूक प्रकरणात अधिकारी व कर्मचा-यांचा सहभाग तपासला जाणार असून, दोषी अधिका-यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा