शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याचा वाद पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 05:01 IST

‘आम्ही समस्त शिवप्रेमी’ आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी १२ जानेवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसविला होता. महापालिकेने १६ जानेवारीच्या मध्यरात्री हा पुतळा हटवून ताब्यात घेतला. तेव्हापासून आमदार रवि राणा विरुद्ध प्रशासन असा वाद पेटला आहे. ही बाब आ. रवि राणा यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, भाजप गटनेते तुषार भारतीय आदींना लक्ष्य केले.

ठळक मुद्देराजापेठ पोलिसात तक्रार पाच जणांना घेतले ताब्यातमहापालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात सांडपाणी साचत असल्याच्या माहितीवरून पाहणीसाठी आलेले महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर तीन महिलांनी अचानक धाव घेत शाई फेकली. कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या वाहनांचा टायर फोडण्याचा प्रयत्न केला आणि पेचकचने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नदेखील केला. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी  आयुक्तांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले. राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवानगी स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याची पार्श्वभूमी या घटनेमागे असल्याचे बोलले जात आहे.‘आम्ही समस्त शिवप्रेमी’ आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी १२ जानेवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसविला होता. महापालिकेने १६ जानेवारीच्या मध्यरात्री हा पुतळा हटवून ताब्यात घेतला. तेव्हापासून आमदार रवि राणा विरुद्ध प्रशासन असा वाद पेटला आहे. ही बाब आ. रवि राणा यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, भाजप गटनेते तुषार भारतीय आदींना लक्ष्य केले. हाच मुद्दा  लोकसभेत मंगळवारी खासदार नवनीत राणा यांनी मांडला. शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी उद्धव ठाकरे सरकार परवानगी देत नाही, असा आरोप केला. दुसरीकडे हा पुतळा १९ फेब्रुवारी रोजी त्याच जागेवर पुन्हा बसविणार, असा निर्णय आमदार रवि राणा यांनी घेतला होता.  त्यासाठी आयुक्त डॉ. आष्टीकर यांना निवेदनाद्वारे पुतळा बसविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी युवा स्वाभिमान संघटनेने केली होती. यादरम्यान बुधवारी आयुक्तांवर शाई फेकल्याचे प्रकरण घडले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. 

१० जणांविरुद्ध गुन्हे दाखल; पाच जण ताब्यात

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या तक्रारीनुसार राजापेठ पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहे. यात अजय बोबडे, सूरज मिश्रा, संदीप गुल्हाने, महेश मुलचंदानी, विनोद येवतीकर यांना ताब्यात घेतले आहे. कमलकिशोर मालाणी यांनी प्रकृती बिघडल्याने ते रुग्णालयात उपचार घेत आहे. तीन महिला व एक पुरुष असे चार जण पसार आहेत. याप्रकरणी भादंविच्या ३०७, ३५३, १२० (ब), १४३, १४७, १४८, १४९ व आयटी ॲक्टनुसार ५०१, ५०२ अन्वये गुन्हे नोंदविले आहे. 

स्क्रू ड्रायव्हरनेही हल्ला!आमदार रवि राणा येणार असल्याचे कमलकिशोेर मालानी यांनी सांगितल्यानेच तेथे गेलो होतो. या व्यक्तींनी माझ्या शासकीय वाहनांची दोन चाके स्क्रू ड्रायव्हरने फोडली व माझ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चालकाने कशीतरी गाडी घरापर्यंत आणली. या धक्काबुक्कीत माझ्या शर्टाची दोन बटने तुटली. नैतिक खच्चीकरणाचा हा प्रकार असल्याचे आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

‘शिवप्रेमीं’च्या नावे पत्रक व्हायरलतासाभरात आयुक्तांच्या अंगावर शाई फेकत असलेले दोन व्हिडिओ व ‘आम्ही समस्त शिवप्रेमी’च्या नावाने आयुक्तांना लिहिलेले पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. यामध्ये उड्डाणपुलावरून शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याबाबत मनपा प्रशासनाचा निषेध करण्यात आला. याशिवाय राजापेठ उड्डाणपूलसुद्धा हटविल्याबाबत जाहीर निषेध करण्यात आला आहे.

 

टॅग्स :agitationआंदोलन