शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

लाचेची मागणी करणारा एपीआय  तक्रारकर्त्याला घेऊन झाला फरार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST

दाखल गुन्ह्यात आरोपी व अटक न करण्यासाठी  ३० हजारांची लाच मागणा-या मारेगाव (जि. यवतमाळ) ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचला. मात्र...

अमरावती -  दाखल गुन्ह्यात आरोपी व अटक न करण्यासाठी  ३० हजारांची लाच मागणा-या मारेगाव (जि. यवतमाळ) ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचला. मात्र, याची कुणकुण लागताच हा एपीआय तक्राकर्त्यालाच आपल्या वाहनात बसवून फरार झाला. या दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. राहुलकुमार राऊत (३२) असे आरोपीचे सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव  आहे. सविस्तर माहितीनुसार, वर्धा येथील मोहिनीनगर येथील ३९ वर्षीय तक्रारदाराने मारेगाव ठाण्यातील एपीआयविरोधात एसीबीकडे तक्रार केली होती. त्याला एपीआय राऊतने ३० हजारांची मागणी केली होती. यासंदर्भाची पडताळणी  एसीबी अधिका-यांनी मंगळवारी केली आणि बुधवारी  सापळा रचला. मात्र, लाचेच्या मागणीच्या पडताळणीदरम्यान पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने यामधील तक्रारदाराजवळील व्हॉइस रेकॉर्डर एपीआयने हिसकले व तक्रारदाराला जबरदस्तीने स्वत:च्या खासगी वाहनात बसवून अज्ञात स्थळी घेऊन गेला. शासकीय कार्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एसीबीने राऊतविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ तसेच भादंविचे कलम ३९२, ३६५, १८६, २०१ अन्वये मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून, दोघांचाही शोध सुरू असल्याचे एसीबीच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस उपअधीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अस्मिता नगराळे, पोलीस शिपाई शेषराव सोयाम, निलेश पाखले, अनिल राजकुमार, किरण खेडकर, भारत चिरडे, महेश वाकोडे, विशाल धलवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrimeगुन्हा