शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण; आठ पोलिसांसह १५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 18:41 IST

वाहनांची तोडफोड, लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर, विभागीय आयुक्तालयाचे गेट तोडले

अमरावती : पांढरी खानमपूर येथील प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीवरून ७ मार्चपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर सुरू असलेल्या  ठिय्या आंदोलनाला सोमवारी सायंकाळी ५ वाजता हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलेले पत्र अमान्य करीत जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या,पाण्याचा मारा केला. तरीही आंदोलनकर्ते थांबले नाहीत अन्‌ पोलिस वाहनांची तोडफोड केली. दरम्यान, आठ पोलिसांसह १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी पांढरी खानमपूर येथील सर्व बौद्ध बांधवांनी गावातून लाँग मार्च काढून गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालय गाठले. विभागीय आयुक्तांनी तीन दिवसांचा अवधी मागितला होता. त्यामुळे सर्व आंदोलनकर्त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. गावातील एका गटाने प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, ही मागणी लावून धरली आहे. त्यावर शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही महापुरुषांची नावे प्रवेशद्वाराला द्यावी, प्रवेशद्वार उभारणीसाठी शासन निधी उपलब्ध करून देईल, असा तोडगा सूचविला होता. मात्र प्रशासनाने लेखी पत्र द्यावे, यावर आंदोलक ठाम होते. दरम्यान सोमवारी विभागीय आयुक्तांकडे कमलताई गवई यांच्यासह पांढरीतील दहा महिला-पुरुषांचे शिष्टमंडळासोबत प्रदीर्घ बैठक झाली व आंदोलनकर्त्यांना पत्र देण्यात आले. मात्र प्रशासनाचे पत्र काहींना अमान्य असल्याने आंदोलकांमध्ये धुसफूस वाढली व तणाव निर्माण झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. 

पत्र अमान्य असल्याने वाढला तणावमंगळवारी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व जि.प.च्या सीईओ हे पांढरीला भेट देतील व दोन्ही गटाची गावात बैठक घेऊन तोडगा काढतील, अशा आशयाचे पत्र शिष्ठमंडळाला दिले. मात्र, हे पत्र अमान्य असल्याने काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. विभागीय आयुक्त कार्यालयाचे गेटही तोडले व आतील वाहनांची तोडफोड केली. 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. आत शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू आहे, असे आंदोलनकर्त्यांना वारंवार पोलीस अधिकारी सांगत होते. दरम्यान काही जणांनी गेटच्या आत प्रवेश केला. पोलिसांवर दगडफेक केली. वाहनांची तोडफोड केली. जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. - नवीनचंद्र रेड्डीपोलीस आयुक्त, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती