शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’साठी अमरावतीचा १३११ कोटींचा आराखडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 17:08 IST

केंद्र शासनाच्या ‘स्मार्टर् सिटी’ अभियानाच्या अंतिम फेरीसाठी अमरावती महापालिकेने १३११ कोटी रुपयांचा आराखडा बनविला आहे.

अमरावती : केंद्र शासनाच्या ‘स्मार्टर् सिटी’ अभियानाच्या अंतिम फेरीसाठी अमरावती महापालिकेने १३११ कोटी रुपयांचा आराखडा बनविला आहे. हा आराखडा शुक्रवारी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला. ३० नोव्हेंबरपूर्वी तो केंद्र शासनाच्या शहर विकास मंत्रालयाकडे पाठविला जाईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्पनेतून आकारास आलेल्या ‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेत अमरावती महापालिकेने आतापर्यंत तीनदा सहभाग घेतला. मात्र, प्रस्ताव स्पर्धेत तग धरू शकला नाही. त्या पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एक सर्वंकष प्रस्ताव अंतिम फेरीसाठी पाठविण्याचे निर्देश पालिकेला प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने पीडब्ल्यूसी कंपनीने पॅनसिटी व रेट्रोफिरिंग या दोन मुख्य घटकांचा समावेश असलेल्या ‘स्मार्ट अमरावती’चा प्रस्ताव बनविला. पहिले तिन्ही प्रस्ताव सदोष असल्याने आलिया कन्सल्टंसीऐवजी डीपीआर बनविण्यासाठी पीडब्ल्यूसी या नव्या कन्सल्टंसीला पाचारण करण्यात आले.

महापालिका आयुक्त हेमंत पवार आणि महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी या एनसीसीने सादरीकरण केले. काही सुधारणा सूचविल्यानंतर या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. कंपनीने तयार केलेला विस्तृत प्रकल्प आराखडा शुक्रवारी राज्य शासनास पाठविण्यात आला. यात घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक सुरक्षा, रोजगार निर्मिती, पार्किंग, कनेक्टव्हिटी, हेरिटेज संवर्धन, सौंदर्यीकरण, तर पॅनसिटी व रेट्रोफिटिंगमध्ये झोपडपट्टी व जुन्या शहरांचा विकास या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. 

चौथा प्रस्तावयाआधी महापालिकेने स्मार्ट सिटीसाठी तीनदा प्रस्ताव पाठविले; मात्र ते स्पर्धेत टिकू शकले नाहीत. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या काळात ५५०० कोटी, त्यानंतर हेमंत पवार यांच्या कार्यकाळात अनुक्रमे २२६८ कोटी व १८०५ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला. आता पाठविलेला प्रस्ताव १३११ कोटींचा आहे. 

जानेवारी २०१६ पासून केंद्र सरकारने ९० स्मार्ट सिटी घोषित केल्या. पहिल्या यादीत २०, दुसºया यादीत १३, तिसºया यादीत २७ व चौथ्या यादीत ३० शहरांचा समावेश होता. यंदाची स्पर्धा ११ शहरांसाठी आहे. 

स्मार्ट सिटीच्या अंतिम फेरीसाठी १३११ कोटी रुपयांचा आराखडा शुक्रवारी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला. तेथून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. हेमंत पवारमहापालिका आयुक्त, अमरावती