शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या त्रासापायी अमरावतीकर तरुणाची ठाणे जिल्ह्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2023 19:33 IST

Amravati News येथील एका ३६ वर्षीय तरुणाने ठाणे जिल्ह्यातील खडवली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.

अमरावती : येथील एका ३६ वर्षीय तरुणाने ठाणे जिल्ह्यातील खडवली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी २५ जूनला उशिरा रात्री मृताच्या पत्नीसह तिच्या तीन नातेवाइकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. महेश रमेश ताथोडे (३६, रा. हरिशांती अपार्टमेंट, साईनगर, अमरावती) असे मृताचे नाव आहे.             याप्रकरणी पंकज दांडगे (४०), जानराव टिकले (६०) यांच्यासह दोन महिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, महेश ताथोडे हा आई-वडिलासह हरिशांती अपार्टमेंट येथे राहत होता. २०२२ मध्ये महेशचे जानराव तिकडे यांच्या मुलीशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोन महिने महेशची पत्नी व्यवस्थित राहिली. त्यानंतर ती नेहमी मोठ्या बहिणीकडे जात होती तसेच सतत फोनवर बोलत होती. त्यामुळे महेशने तिला विचारपूस केली असता, तिने महेश व त्याच्या आई-वडिलांसोबत वाद घातला होता. या कारणाने महेश तणावात होता.

सांगून गेला, आलाच नाही

पत्नीच्या वागण्याबाबत महेशने पत्नीची बहीण तसेच तिच्या वडिलांना सांगितले असता, त्यांनी महेशला हातपाय तोडण्याची धमकी दिली. तेव्हापासून ती त्याच्यासोबत व्यवस्थित राहत नव्हती. २९ एप्रिल २०२३ रोजी रूपाली सकाळी बहिणीच्या घरी गेली. मात्र सायंकाळपर्यंत परत न आल्यामुळे महेशने तिला फोन केला. परंतु, तिने येण्यास नकार दिला. ३० एप्रिल रोजी सायंकाळी महेश घरातून निघून गेला. मात्र, १ मे रोजीसुद्धा तो घरी परत न आल्यामुळे रमेश ताथोडे यांनी बडनेरा पोलिसात तो हरविल्याबाबत तक्रार दिली.

 

पत्नी पतीच्या अंत्यसंस्काराला आली नाही

ठाणे जिल्हयातील खडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत महेशने ३ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती रमेश ताथोडे यांना खडवली पोलिसांनी दिली. ताथोडे हे नातेवाईकांसह खडवली ठाण्यात पोहोचले. ५ मे रोजी मुलाचा मृतदेह घेऊन ते अमरावतीत परतले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आला. दरम्यान, महेशच्या अंत्यसंस्काराकडे त्याची पत्नी व अन्य तीन नातेवाइकांनी पाठ फिरवली. महेशने पत्नी व तिच्या तीन नातेवाइकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार महेशच्या वडिलांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यू