शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीकर रॅपर आर्या जाधव मराठी बिग बॉसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 11:23 IST

पाचव्या पर्वातील स्पर्धक: गीतलेखन, गायन, चाल सबकुछ आर्याच

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : एका खासगी वाहिनीवरील 'हसल-२' या कार्यक्रमात रॅप प्रकारातील गायनातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अमरावतीकर आर्या जाधव ही आता 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. आर्या ही येथील उद्योजक हेमंत जाधव यांची कन्या. येथील कॅम्प परिसरात वास्तव्याला असलेल्या आर्या जाधव हिला गायन व गीतलेखनाची आवड आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाला रविवारपासून सुरुवात झाली. त्यात ती सहभागी झाली आहे. ती उत्तम परफॉर्मन्सदेखील करीत आहे.

मराठमोळा रितेश देशमुख मराठी बिगबॉसचे सूत्रसंचालन करत असून, आर्यासह अन्य स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला आहे. कोरोना काळात घरी असताना आर्याला एक दिवस रॅप लिहिण्याची कल्पना सुचली. त्यानंतर घराच्या छतावर बसून आर्याने रॅप लिहायला सुरुवात केली. 'हसल-२' या कार्यक्रमात आर्याने १० स्पर्धकांना मागे टाकत उपांत्य फेरी गाठली होती. आर्या जाधवचा 'क्यूके' नावाचा स्वतःचा बँड आहे, जो यू ट्यूबवर खूप धमाल करत आहे. आर्याने 'रॅपर गर्ल' म्हणून ओळख मिळवली आहे. 'कलर्स मराठी'वर आता प्रेक्षकांना रोज रात्री ९ वाजता 'बिग बॉस मराठी' पाहता येणार आहे.

आर्या आर्किटेक्चर, नव्हे 'क्युके'आर्याने येथील होली क्रॉस हायस्कूलमधून दहावी तर गोल्डन किड्समधून बारावी उत्तीर्ण केली. नागपूरला बी. आर्क केल्यानंतर कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होम सुरू असताना रॅप सिंगिंगमध्ये ती रस घेऊ लागली. त्यातून पुढे मिळालेल्या संधीचे सोने करत ती सोशल मीडियातून, यू ट्यूबच्या माध्यमातून तरुणाईच्या गळ्यातली ताईत बनली. 'क्यूके नावाच्या स्वतःच्या बँडने ती घराघरात पोहोचल्याने तिला मराठी बिग बॉसमधून बोलावणे आल्याचे तिचे वडील तथा ख्यातनाम उद्योजक हेमंत जाधव यांनी 'लोकमत'ला सांगितले. आर्याची आई रश्मी या गृहिणी असून, तिचा लहान भाऊ शिवराज हा इंजिनिअर आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीBigg Boss Marathiबिग बॉस मराठी