शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
7
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
8
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
9
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
10
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
11
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
12
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
13
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
14
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
15
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
16
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
17
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
18
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
19
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
20
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

अमरावतीकरांनो, साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:30 PM

मुंबई शहरात लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राज्यात इतरत्र लेप्टोचा फैलाव नसला तरी आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

ठळक मुद्देलेप्टोसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना : महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुंबई शहरात लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राज्यात इतरत्र लेप्टोचा फैलाव नसला तरी आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्या अनुषंगाने लेप्टोला प्रतिबंध करण्यासाठी घरामध्ये आणि वस्त्यांमध्ये स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे; जेणेकरून उंदरांचे प्रमाण वाढणार नाही. पावसाळ्यात योग्य काळजी घेणे, विशेषत: पायास जखम असल्यास साचलेल्या पाण्यात अथवा पुराच्या पाण्यातून मार्गक्रमण टाळण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. दूषित पाणी, माती आणि भाज्यांशी संपर्क टाळणे हा लेप्टो टाळण्याचा उपाय आहे. दूषित पाण्याशी संपर्क ठेवणे अपरिहार्य असल्यास रबरबूट , हातमोजे वापरावेत आणि रोगाची लक्षणे दिसताच आरोग्य यंत्रणेला त्वरित कळवावे ,असे आवाहन करण्यात आले आहे.लागण होण्याची कारणेलेप्टोची लागण झालेल्या प्राण्यांचे मल-मूत्र, रक्त आणि रक्तघटकांपासून सरळ संबंधाने किंवा वातावरणातून लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरावरील जखमांद्वारे किंवा पातळ स्रायूंद्वारे शरीरात प्रवेश करतात. मात्र, रोगी माणसाकडून हा आजार निरोगी माणसास होत नसल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले.या अवयवांना बाधा होऊ शकतेच्यकृत, काविळीची लक्षणे दिसतात. मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होऊन ते निकामी होऊ शकते. लघवीचे प्रमाण कमी झाल्यास तात्पुरते डायलिसीस करावे लागू शकते. फुफ्फुसाला बाधा झाल्यास रुग्णास खोकला, छातीत दुखणं व खोकल्यातून रक्त येऊ शकते. श्वासोच्छवासाच्या त्रासासारखी गंभीर समस्या उद्भवून कृत्रिम श्वासोच्छवास यंत्राची रुग्णास गरज भासू शकते तसेच रक्तातील पेशी कमी होऊन अंगावर लाल ठिपके अथवा लाल-काळे चट्टे उमटू शकतात. नाकातोंडातून अथवा लघवीद्वारे रक्तस्राव होऊ शकतो. वरील सर्व लक्षणांमुळे लेप्टोस्पायरोसिसशिवाय डेंग्यू किंवा कॉम्प्लिकेटेड मलेरियाबाबत संभ्रम निर्माण होऊ शकते.रोगनिदान : लेप्टोस्पायरोसिसच्या जिवाणूंविरुद्ध शरीरातील अँटिबॉडीजची चाचणी एलिसा, एमएटी आणि पीसीआर टेस्टद्वारे लेप्टोस्पायरोसिसचे निदान करता येते तसेच लिव्हर आणि किडणी या चाचण्या सी.बी.सी, एक्स-रे या द्वारे निदान करण्यास मदत होऊ शकते. माणसाचे रक्त व लघवीमध्ये लेप्टोस्पायरा हे जंतू सापडतात. रक्तात पहिले सात दिवस व लघवीत आजाराच्या दहाव्या दिवसापासून रोगजंतू आढळतात.उपचार : सौम्य स्वरूपाचा आजार असल्यास बाह्य रूग्ण विभागातून गोळ्या-औषध घेणे आणि गुंतागुंतीच्या वरील नमूद केलेल्या लक्षणांबद्दल सतर्क राहाणे तसेच डॉक्टरांच्याच सल्ल्याने औषधोपचार करणे गरजेचे आहे. पेनिसिलिन हे औषध गंभीर रुग्णांवर फायदेशीर ठरते. स्ट्रेप्टोमायसिन व ट्रेटासायक्लिन ही प्रतिजैविकेसुद्धा उपयुक्त आहेत. मात्र, रोग टाळण्यासाठी प्रतिबंधक औषधे ( केमोप्रोफिलॅक्सिस) देऊ नयेत.