एका क्लिकवर महिलांना मदत : पोलीस आयुक्तालयात सॉफ्टवेअरचे लोकार्पणअमरावती : महिला सुरक्षेच्या दृष्ट्रीने आयवॉच सॉफ्टवेअरचे सोमवारी दुपारी ४ वाजता पोलीस आयुक्तालयात लोकार्पण करण्यात आले. मोबाईलच्या एकाच क्लिकवर महिलांना १० ते १५ मिनिटांत पोलीस मदत मिळणार आहे. त्यामुळे अमरावतीच्या महिला आपल्या सुरक्षेसाठी आता अधिकच स्मार्ट बनल्या आहेत. दिल्ली येथील इंडियन आई सिक्युरिटी या कंपनीच्या आयवॉच सॉफ्टवेअरचे एरिया मॅनेजर मिलिंद लगाडे यांनी सोमवारी आयवॉचच्या लोकार्पणावेळी प्रात्यक्षिकातून ही माहिती दिली. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्या दृष्टीने पोलीस विभाग सतर्क होता, मात्र आयवॉच सॉफ्टवेअरच्या अत्याधुनिक माध्यमातून आता महिलांना झटपट पोलीस सुरक्षा प्रदान होणार आहे. महिलांना तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी पुढाकार घेऊन आयवॉच सॉफ्टेवअर कार्यान्वित केले आहे. ज्या महिलांकडे स्मार्ट फोन आहेत, त्यांना हे सॉफ्टवेअर अत्यंत उपयोगी पडणार असून इंटरनेट व जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून महिलांना ही सुविधा मिळणार आहे.
'आय वॉच'मुळे अमरावतीच्या महिला बनल्या स्मार्ट
By admin | Updated: March 3, 2015 00:20 IST