शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट; शिशू मृत्यूमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 05:42 IST

आधीच व्हेंटिलेटरवर असलेल्या आणखी एका शिशुची प्रकृती गंभीर आहे.

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरीन) एसएनसीयूमध्ये नव्याकोऱ्या व्हेंटिलेटरचा रविवारी स्फोट होऊन एका शिशुचा मृत्यू झाला. १२ नवजात शिशूंना इतर ठिकाणी हलविले. आधीच व्हेंटिलेटरवर असलेल्या आणखी एका शिशुची प्रकृती गंभीर आहे. स्फोट शॉर्टसर्किटमुळे झाल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. यामुळे ९ जानेवारी २०२१ रोजी भंडारा रुग्णालयाच्या अग्निकांडाची आठवण ताजी झाली.

व्हेंटिलेटरने पेट घेताच सलमा खान या परिचारिकेने व्हेंटिलेटरवरील नवजात शिशूंना उचलून बाजूला केले. आगीमुळे विभागात सर्वत्र धूर पसरला होता. कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळवले.

महिनाभरापूर्वीचे व्हेंटिलेटरया विभागात एकूण तीन व्हेंटिलेटर असून, दोन व्हेंटिलेटर महिनाभरापूर्वीच प्राप्त झाले होते. याच नवीन व्हेंटिलेटरमधील एका व्हेंटिलेटरला आग लागली. हे व्हेंटिलेटर शनिवारी रात्रीपासून चालू-बंद होत असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

क्षमता २७, दाखल ३७या विभागाची क्षमता २७ बालके भरती करण्याची आहे; परंतु या ठिकाणी नेहमीच ३५ ते ४० शिशू दाखल असतात. रविवारीदेखील येथे ३७ शिशू उपचारांसाठी दाखल होते.

फायर ऑडिट होऊनही... या विभागात यापूर्वीही शॉर्टसर्किट झाले होते. बीएमसीकडून रुग्णालयातील फायर ऑडिट झाल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या वाठोडकर यांनी दिली. त्यामुळे रुग्णालयात शॉर्टसर्किट होते कसे, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीhospitalहॉस्पिटल