शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा १५ एप्रिलपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 11:32 IST

Amravati : असे आहे परीक्षांचे वेळापत्रक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२५ परीक्षांना १५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. त्या अनुषंगाने परीक्षा विभागाने नियोजन चालविले असून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. यात सर्व सत्राच्या सम आणि विषम परीक्षांचा समावेश असणार आहे.

अधिसूचना क्रमांक १६/ २०२५ अन्वये उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तर दुसरीकडे परीक्षांर्थ्यांकडून उन्हाळी परीक्षांसाठी आवेदन पत्र मागविले जात आहे. ही कार्यवाही महाविद्यालयांना करावी लागणार आहे. त्यानुसार विद्यापीठाने प्राचार्यांना कळविण्यात आले आहे.

परीक्षा विभागाने प्रकाशित केलेल्या अनुसूचीनुसार विद्या शाखानिहाय १२२ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. सीबीसीएस नवीन, विधी, अभियांत्रिकी, एनईपी पीजी, फार्मसी, कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान शास्त्र, एनईपी यूजी, शारीरिक शिक्षण आदी परीक्षांचा समावेश असणार आहे.

असे आहे परीक्षांचे वेळापत्रक

  • १५ एप्रिलपासून पुढे : सत्र पद्धतीमधील सर्व विषम सत्राच्या परीक्षा व वार्षिक पद्धतीमधील परीक्षा
  • १९ मेपासून पुढे : सत्र पद्धतीमधील सर्व विषम सत्राच्या परीक्षा, एनईपी (यूजी) सत्र १ परीक्षा व वार्षिक पद्धतीमधील एनएईपी (पीजी)
  • १९ जूनपासून पुढे : बी.ए (सीजीएस) सत्र- २, बी.ए. (सीबीसीएस) सत्र -१ आणि सत्र -२, एन.ई.पी. (पीजी) सत्र- ४, एन.ई.पी. (यूजी) सत्र- २ अभ्यासक्रमाच्या परीक्षा तसेच शासनस्तरावर प्रवेश होणाऱ्या अभ्यासक्रमांच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा आदी.

"उन्हाळी परीक्षांमध्ये साधारणतः दीड लाख परीक्षार्थी आवेदन सादर करतात. त्या अनुषंगाने अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील १८३ महाविद्यालयाच्या केंद्रांवर या परीक्षा घेण्यात येतील. तयारी वेगाने केली जात आहे."- डॉ. नितीन कोळी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :AmravatiअमरावतीEducationशिक्षण