शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीचे खासगी क्लासेस रडारवर, अमरावती विद्यापीठाच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 17:43 IST

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी मॅकेनिक्स या विषयाचा पेपरफूट प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी मॅकेनिक्स या विषयाचा पेपरफूट प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी अमरावती शहरातील काही अभियांत्रिकीचे खासगी क्लासेस रडारवर असल्याची माहिती हाती आली आहे.

पेपरफुटीप्रकरणी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांच्या तक्रारीन्वये आशिष राऊत (रा. बोर्डी, ता. अकोट जि. अकोला) ज्ञानेश्र्वर बोरे (रा. उकळी ता. मेहकर जि. बुलडाणा) या दोघांविरूद्ध फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण पोलिसात देण्यापूर्वी अमरावती विद्यापीठाने प्राथमिक स्तरावर याची चौकशी पूर्ण केली. पेपरफूट प्रकरणाचा मास्टर मार्इंड कोण? हे शोधूनदेखील काढले. त्यानंतर ४ जून रोजी सिनेट सभेत सदस्यांच्या मागणीनुसार कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी त्रीसदस्यीय समिती गठित करून प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल गोळा केल्याने यातून बहुतांश बाबी स्पष्ट झाल्यात. पेपरफूटप्रकरणी आरोपींकडून मोबाइल जप्त करण्यात आला आहे. ही सर्व पार्श्वभूमी विद्यापीठ प्रशासनाने आपल्या स्तरावर पूर्ण केल्यानंतरच पोलिसांत तक्रार नोंदविली. आता केवळ पोलिसांनी पेपर ‘लीक ’प्रकरणी यात कुणाचा सहभाग, हे शोधून काढण्याच्या दिशेने तपास आरंभला आहे. आशिष राऊत आणि ज्ञानेश्र्वर बोरे या दोघांची कनेक्टिव्हीटी, नेटवर्क शोधण्याच्या दिशेने तपास सुरू आहे. यातील दोन्ही आरोपींचे बयाण नोंदविल्यानंतर अभियांत्रिकीचे खासगी क्लासेस पोलिसांच्या रडारवर असणार आहे. राऊत आणि बोरे यांचे काही अभियांत्रिकीच्या खासगी क्लासेसच्या संचालकांसोबत मधुर संबंध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

लग्न जुळले अन् आशिष पेपरफूट प्रकरणात अडकलाअमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अस्थायी कर्मचारी म्हणून आशिष राऊत कार्यरत होता. आशिष हा संगणक हाताळण्यात एक्सपर्ट आहे. दरम्यान विद्यापीठात नोकरी करीत असल्यामुळे त्याचे लग्नदेखील जुळले. मात्र, आता अचानक तो पेपरफूटप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून समोर आल्याने त्याच्या लग्नप्रसंगावरही गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पेपर ‘लीक’ प्रकरणाचे धागेदोरे लांबदूर असल्याप्रकरणी पोलिसांनी त्यादिशेने तपास चालविला आहे.

पेपरफूटप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. नेमके तक्रारीत कोणती बाब आहे, त्यादिशेने तपास केला जाईल. यातील दोषींना न्यायालयातून कठोर शासन होण्याच्या दिशेने तपास केला जाईल.   - राजू लेवटकर,    तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

टॅग्स :AmravatiअमरावतीEducation Sectorशिक्षण क्षेत्रCrime Newsगुन्हेगारी