शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

अमरावती विद्यापीठात आता सिनेटच्या नामनिर्देशित सदस्यांसाठी मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 16:34 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) निवडणूक गत आठवड्यात आटोपली. आता सिनेट नामनिर्देशित सदस्यपदावर वर्णी लावण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली

 अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) निवडणूक गत आठवड्यात आटोपली. आता सिनेट नामनिर्देशित सदस्यपदावर वर्णी लावण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली असून, त्याकरिता ह्यगॉडफादरह्णकडे साकडे घातले जात आहेत. १६ नाामनिर्देशित सदस्यांची अधिसभेवर नियुक्ती होणार आहे.विद्यापीठाशी संलग्न अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील मतदारांनी १५ आॅक्टोबर रोजी सिनेट निवडणूक प्रक्रि येत सहभाग घेतला. १७ आॅक्टोबर रोजी झालेल्या मतमोजणीअंती सिनेट, विद्यापरिषद, अभ्यास मंडळात प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी व विद्यापीठ शिक्षक अशा विविध प्राधिकारिणीतून १२३ सदस्य विजयी झालेत. ज्यांना थेट सिनेट निवडणूक लढविणे शक्य नव्हते, परंतु विद्यापीठाच्या राजकारणात आवड, रस आहे, अशांनी आता सिनेटमध्ये नामनिर्देशित सदस्यत्व मिळावे, यासाठी राजकीय आश्रय घेतल्याचे चित्र आहे. विद्यापीठात नामनिर्देशनद्वारे १६ सदस्य अधिसभेत पोहोचतील. यात राज्यपालांकडून १०, कुलगुरूंकडून ३, जिल्हा परिषदेतून शिक्षण समिती सदस्य, तर विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतीद्वारे प्रत्येकी एका सदस्याची नियुक्ती होणार आहे. कुलगुरूंकडून पाठविले जाणारे तीन सदस्य हे विद्यापीठ कर्मचारी, महाविद्यालय, महापालिका अथवा नगर परिषदेतून राहतील, अशी माहिती आहे. राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषद सभापती यांच्याकडून नामनिर्देशित होणारे बहुतांश सदस्य हे राजकीय आश्रयानेच विद्यापीठाच्या अधिसभेत पोहोचतात, असा इतिहास आहे. हीच परंपरा राज्याचे भाजप सरकार पुढे नेणार, यात दुमत नाही. सिनेटमध्ये नियुक्त होणारे काही जण शिक्षणक्षेत्राशी दुरान्वये संबंध नसलेले राहतात. त्यामुळेच राजकीय आघाडी सांभाळणारे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्तेही ह्यसेटिंगह्णच्या प्रयत्नात आहेत. विद्यापीठाचे नामनिर्देशित सिनेट सदस्य नियुक्तीसाठी काहींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह कॅबिनेट व राज्यमंत्र्यांकडेही साकडे घातले आहे, तसेच काही आमदारांनीदेखील त्यांच्या विश्वासू आणि जवळीक कार्यकर्त्यांची नावे सिनेट सदस्य नामनिर्देशनासाठी मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती आहे.तरच प्राधिकारिणीचे होईल गठणविद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीनंतर आता नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती झाल्याशिवाय प्राधिकारिणीचे गठण होणार नाही, हे वास्तव आहे. त्यांची आॅक्टोबरअखेपर्यंत नियुक्ती होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ