शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाला मिळाले नवे शिलेदार; डॉ. अविनाश असनारे नवे कुलसचिव

By गणेश वासनिक | Updated: June 20, 2024 19:12 IST

नितीन कोळी हे परीक्षा व मूल्यांकन संचालकपदी, नागपूरचे डॉ. पुष्कर देशपांडे वित्त व लेखाधिकारीपदी नियुक्त

गणेश वासनिक, अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला नवे शिलेदार मिळाले असून गत अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या अधिकारी पदाचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी घेतलेल्या विविध पदांच्या मुलाखतीनंतर नवे कुलसचिव, परीक्षा व मूल्यांकन संचालक, वित्त व लेखाधिकारी आणि नवोपक्रम व साहचार्य मंडळ संचालकपदी नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

विद्यापीठ प्रशासनाचा कणा असलेल्या कुलसचिवपदी डॉ. अविनाश असनारे यांची वर्णी लागली आहे. डॉ. असनारे हे अगोदर विद्यापीठात शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालकपदी कार्यरत होते. डॉ. असनारे यांच्या रूपाने कुलसचिवपदी एक हसमुख, चौफेर व्यक्तिमत्त्व आणि दांडगा जनसंपर्क असलेली व्यक्ती मिळाली आहे. डॉ. नितीन कोळी यांच्याकडे नव्याने परीक्षा व मूल्यांकन संचालकपदाची जबाबदारी आली आहे. डॉ. कोळी यांनी यापूर्वी परीक्षा नियंत्रकपदाचा प्रभारदेखील सांभाळला आहे. हल्ली कोळी यांच्याकडे वित्त व लेखाधिकारी पदाचा प्रभार होता. वित्त व लेखाधिकारी म्हणून नागपूर येथील डॉ. पुष्कर देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. नवोपक्रम व साहचार्य मंडळ संचालकपदी अकोला येथील डॉ. अजय लाड यांची नियुक्ती करण्याचा आदेश गुरुवारी जारी करण्यात आला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती