शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: टँकर आला गावा; भांडी घेऊन धावा, पश्चिम विदर्भात ९१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 24, 2024 21:54 IST

Amravati News: ‘मे हीट’मुळे जलस्रोत कोरडे पडत असल्याने पश्चिम विदर्भात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. सद्यस्थितीत तात्पुरत्या उपाययोजनांवर प्रशासनाचा भर आहे. यामध्ये ४३६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, ८६ गावांमध्ये ९१ टँकरद्वारे तहान भागविल्या जात आहे.

- गजानन मोहोडअमरावती  - ‘मे हीट’मुळे जलस्रोत कोरडे पडत असल्याने पश्चिम विदर्भात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. सद्यस्थितीत तात्पुरत्या उपाययोजनांवर प्रशासनाचा भर आहे. यामध्ये ४३६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, ८६ गावांमध्ये ९१ टँकरद्वारे तहान भागविल्या जात आहे. गतवर्षी याच दिनांकाला ३० टँकर सुरू होते.

गतवर्षी यवतमाळ वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट राहिली आहे. शिवाय जून महिन्यात ६ व ऑगस्टमध्ये फक्त सात दिवस पावसाचे राहिल्याने जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे भूजलस्तरात झपाट्याने कमी येत आहे. अशातच जलस्त्रोताला कोरड लागली व आचारसंहितेमध्ये पाणीटंचाईच्या उपाययोजना अडकल्याने तहानलेल्या गावांच्या दाहकतेमध्ये भर पडली आहे.

विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार किमान दोन लाख नागरिकांची तहान सध्या टँकरवर भागविल्या जात आहे. यामध्ये सर्वाधिक ६७ टँकर बुलडाणा जिल्ह्यात सुरू आहे, तर वाशिम व अकोला जिल्ह्यात निरंक आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यात १३, यवतमाळ जिल्ह्यात ६ टँकर सुरू आहेत. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने मे महिन्याअखेर विभागात २००वर गावांमध्ये टँकर सुरू होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २५७ विहिरींचे अधिग्रहणअमरावती विभागात सद्य:स्थितीत ४३६ खासगी विहीर व विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २५७, अमरावती ८६, वाशिम ५३, यवतमाळ २७ व वाशिम जिल्ह्यात १२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. विभागात सद्य:स्थितीत ८६ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. आठ दिवसांत पुन्हा ८४ गावांची भर पडण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

टॅग्स :water shortageपाणीकपातAmravatiअमरावती