शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी अडत्याची मुंबई एक्स्प्रे सपुढे उडी घेऊन आत्महत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 18:52 IST

कर्जाच्या डोंगरामुळे एका अडत्याने अमरातीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावर मुंबई एक्स्प्रेसपुढे उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दीपक गणेश बिजोरे (५२, रा. मसानगंज) असे मृताचे नाव आहे.

अमरावती - कर्जाच्या डोंगरामुळे एका अडत्याने अमरातीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावर मुंबई एक्स्प्रेसपुढे उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दीपक गणेश बिजोरे (५२, रा. मसानगंज) असे मृताचे नाव आहे. कर्जामुळे आत्महत्या करीत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद असल्याचे जीआरपी पोलिसांना आढळून आले आहे.       अमरावती-मुंबई एक्स्प्रेस सायंकाळी ७ वाजता मॉडेल रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक १ वरून सुटले. तत्पूर्वी, रेल्वेच्या डब्याचे इंजीन लावण्यात येते. मंगळवारी सायंकाळी गाडी निघण्यापूर्वी इंजीन चिचफैलपर्यंत जात असताना दीपक बिजोरेने रेल्वेसमोर उडी घेतली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. घटनेच्या माहितीवरून जीआरपी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमी अवस्थेत पडलेल्या दीपक बिजोरे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांना मृताच्या खिश्यात मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. 'माझ्यावर कर्ज असून, परतफेड करणे कठीण आहे. त्यामुळे मी जीवन संपवत आहे’, असे त्यामध्ये नमूद आहे. सोबतच त्याने पत्नी व मुलाची क्षमा मागितल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. इर्विन रुग्णालयात बुधवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. 

दीपक बिजोरेने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास येत आहे. त्याच्याकडे मिळालेल्या चिठ्ठीत कर्जामुळे आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील चौकशी सुरू आहे. - राजेश नागरे, पोलीस उपनिरीक्षक, जीआरपी.

टॅग्स :Suicideआत्महत्याAmravatiअमरावती