शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
7
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
8
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
9
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
10
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
11
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
12
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
13
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
14
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
15
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
16
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
17
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
18
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
19
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
20
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

समाजसेवेचा आदर्श : पोलीस आयुक्त वरपिता, तर खासदार बनणार वधुपिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 20:36 IST

अमरावती शहरातील कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस आयुक्त वरपिता, तर खासदार वधुपित्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांच्या विसाव्या पाल्याच्या विवाहाच्या अनुषंगाने बुधवारी शंकरबाबांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांचा होकार घेतला.   

अमरावती -  शहरातील कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस आयुक्त वरपिता, तर खासदार वधुपित्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांच्या विसाव्या पाल्याच्या विवाहाच्या अनुषंगाने बुधवारी शंकरबाबांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांचा होकार घेतला.   समाजसेवेचा आदर्श ठेवणारे शंकरबाबा पापळकर यांच्या वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य बालगृहातील वैशालीचा विवाह तेथीलच मूकबधिर मानसपुत्र अनिलशी ठरला आहे. या विवाहात वरपित्याची भूमिका बजाविण्याची विनंती शंकरबाबा यांनी बुधवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना केली. यावेळी पोलीस आयुक्तालयात संजयकुमार बाविस्कर व शंकरबाबा यांच्यात दिलखुलास चर्चा रंगली. शंकरबाबा यांनी आपल्या मानस मुलांची व्यथा सांगत, त्यांच्या आगामी भविष्याची चिंता व्यक्त केली. आयुक्तांनी नि:संकोचपणे हा प्रस्ताव स्वीकारला. बाविस्कर यांची संवादशैली व त्यांच्या कार्यप्रणालीने शंकरबाबा प्रभावित झाले होते. खा. आनंदराव अडसूळ वैशालीचे कन्यादान करणार आहे. येत्या २ फेब्रुवारी रोजी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, खा. आनंदराव अडसुळ व पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांची लग्न समारंभाविषयी विशेष बैठक होईल. त्या दिवशी लग्नाचा मुहूर्त ठरेल.

गाडगेबाबांची गोदडी आयुक्तांच्या खांद्यावर१९५५ साली बहिरमच्या यात्रेत शंकरबाबा गेले असता, त्यांची भेट गाडगेबाबांशी झाली होती. त्यावेळी गाडगेबाबांनी शंकरबाबांना त्यांची गोदडी भेट दिली होती. समाजहित जोपासण्यासाठी जो सत्यतेची बाजू घेऊन काम करीत असेल, समाजउपयोगी कार्य करीत असेल, अशा व्यक्तीच्या खाद्यावर ती गोदडी टाकशील, असे गाडगेबाबांनी शंकरबाबांना सांगितले होते. गाडगेबाबांचे ते व्यक्तव्य शंकरबाबांच्या स्मरणात होते. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याशी संवाद साधताना शंकरबाबांना गाडगेबाबांचे ते शब्द आठवले. त्यामुळे शंकरबाबांनी गाडगेबाबांची ती गोदडी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या खाद्यांवर ठेवून त्यांना तो सन्मान दिला. 

असे मिळाले वैशाली व अनिलमुकबधीर अनिल हा दोन वर्षांचा असताना मुंबई स्थित डोंगरी येथील भेंडीबाजारमध्ये बेवारस स्थितीत आढळून आला होता. त्याला बाल कल्याण समितीच्या आदेशाने वझ्झर येथील बालगृहात पाठविण्यात आले होते. सातव्या वर्गापर्यंत शिकल्यानंतर अनिलला परतवाडा येथील मूकबधिरांच्या शाळेत नोकरी देण्यात आली. त्याचे लग्न वैशाली नामक अनाथ मुलीशी जुळविले आहे. वैशाली ही १९९५ साली चेंबूर येथे एका कचºयाच्या ढिगाºयावर बेवारस अवस्थेत आढळून आली होती. दोन वर्षांपर्यंत मुंबई पोलिसांनी तिच्या माता-पित्याचा शोध घेतला. त्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशाने तिलाही वझ्झर येथील बालगृहात आणल्या गेले होते. आता ती २३ वर्षांची झाली आहे. 

शंकरबाबा यांच्या मानसपुत्राच्या वरपित्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांच्या विवाह सोहळ्यात जाऊन ती जबाबदारी पूर्ण करू. संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र