शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: कत्तल, तस्करी रोखली, ५४ गोवंशांची मुक्तता, अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: November 24, 2023 19:15 IST

Amravati News: शिरखेड पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई करत तब्बल ५४ गोवंशाचा जीव वाचवला. त्या गोवंशाला केकतपूर गोशाळेत हलविण्यात आले.

- प्रदीप भाकरेअमरावती/ मोर्शी - शिरखेड पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई करत तब्बल ५४ गोवंशाचा जीव वाचवला. त्या गोवंशाला केकतपूर गोशाळेत हलविण्यात आले. २४ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास मोर्शी अमरावती मार्गावरील गोराळा येथे ही कारवाई करण्यात आली. तेथून अल्लाउददीन रज्जाक खान (३९, बडी होली सारंगपूर, मध्यप्रदेश), उस्मान खान मजित खान (३०, मुखेलवाडी, मध्यप्रदेश) व बादशाह खान खुदाबक्ष खान (३३, रा. पल्ला, हरियाणा) यांना अटक करण्यात आली.

 शिरखेड पोलीस पथक शुक्रवारी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान गोराळाजवळ पेट्रोलिंग करीत असतांना त्यांनी मध्यप्रदेशातून येत असलेल्या ट्रकची पाहणी केली. ट्रकमध्ये लाकडी पाटयांच्या सहाय्याने दोन कप्पे तयार करुन त्यात ती जनावरे कोंबली होती. ती कत्तलीकरिता नेण्यात येत होती. ती सुमारे ८.५५ लाख रुपये किमतीचे जनावरे व १६ लाख रुपये किमतीचा ट्रक असा २४.५५ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. ट्रकमालकाचा शोध सुरू आहे.

यांनी केली कामगिरीपोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात शिरखेडचे ठाणेदार सुरज तेलगोटे, अंमलदार संजय वाघमारे, नितेश वाघ, गजानन तिजारे, शेख शकुर, चालक अरुण श्रीनाथ यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी