शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: राजापेठ उड्डाणपुलावर अपघात; दुचाकीवरील तरुणाचा भरधाव ट्रकने घेतला बळी, दोन जखमी

By प्रदीप भाकरे | Updated: May 27, 2024 20:16 IST

Amravati Accident News: भरधाव ट्रकने मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक व अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला.

- प्रदीप भाकरे अमरावती - भरधाव ट्रकने मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक व अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला. राजापेठ उड्डाणपुलाखाली कुथे हॉस्पिटलजवळ २७ मे रोजी सकाळी ११:४५ च्या सुमारास हा अपघात घडला. पीयुष तुकाराम राठोड (१८) असे मृताचे नाव आहे, तर ओम देवानंद कुरडे (१८) व आदित्य पांडुरंग धादोड (१८) अशी जखमींची नावे आहेत. ते तिघेही यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील नखेगाव येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी आदित्य धादोड यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी एमएच ४६-ई ३११० या ट्रकच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नखेगाव येथील रहिवासी असलेला आदित्य अमरावती येथील एका गॅरेजवर काम करतो. त्या तिघांनीही नुकतीच बारावीची उत्तीर्ण केली आहे. २७ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास आदित्य गॅरेजवर गाडी धूत असताना त्याचा मित्र ओम कुरडे व पीयुष राठोड तेथे आले. त्यानंतर तिघांनी एमएच २७-एएक्स ८५९२ या दुचाकीने गाडगेनगर येथे जाऊन ॲडमिशन फॉर्म भरला. तेथून ओम व पीयुषला बसस्टँडला सोडण्याकरिता आदित्य राजापेठकडे निघाला. त्यावेळी आदित्य दुचाकी चालवत होता. त्याच्या मागे ओम व पीयुष बसलेले होते. अंदाजे ११:४५ च्या सुमारास तिघेही इर्विनकडून उड्डाणपुलावरून राजापेठ भागात खाली उतरत असताना अचानक एक मालवाहू वाहन राजापेठकडे वळले. त्यामुळे आदित्यने दुचाकीचे ब्रेक दाबले. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात पीयुष हा दुचाकीच्या उजव्या बाजूने खाली पडला, तर आदित्य व ओम डाव्या बाजूला खाली पडले. त्यामुळे पीयुषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच मरण पावला, तर ओमच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. बघ्यांची गर्दी वाढताच ट्रक चालकाने पळ काढला. दुसरीकडे राजापेठ व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती