लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे स्थगित असलेली राज्य परिवहन महामंडळाची अमरावती - पुणे ही बस ६ सप्टेंबर रोजी येथील मध्यवर्ती बसस्थानकाहून सांयकाळी ६ वाजता सोडली जाणार आहे. मागील मार्च महिन्यापासून एसटी बसफेऱ्या महामंडळाने बंद केल्या होत्या. पहिल्या टप्यात महामंडळाने जिल्हातंर्गत बस फेऱ्या सुरू केल्या. त्यानंतर २० ऑगस्ट पासून जिल्ह्याबाहेर बसफेऱ्या सुरू करण्यात आल्यात. परंतु लांबपल्यावर धावणाऱ्या बसेस बंद होत्या. रविवारी अमरावती - पुणे ही लांबपल्ल्यावर धावणारी पहिली विनावातानुकूलित शिवशाही बस मध्यवर्ती बसस्थानकावरील फलाट क्रमांक ९ वरून सोडण्यिात येणार आहे. सदरची बस ही आसनी, शयनी प्रकारामध्ये सुरू करण्यात येत आहे. या बससाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. या लांबपल्याच्या बस करीता १० प्रवाशांनी महामंडळाकडे आगाऊ आरक्षण केले आहे. विशेष म्हणजे अमरावती पुणे ही बस पूर्वी वातानुकूलित होती. परंतु कोरोनामुळे एसी गाडी चालविता येत नसल्याने ही गाडी आता वातानुकूलित असणार नाही. अमरावती औरंगाबाद पर्यंचे भाडे ६१० रुपये तर अमरावती पुणे पर्यंतचे भाडे १०२५ रुपये आकारले जाणार आहे.प्रवाशांचा वाढता प्रतिसाद१५ दिवसांपासून महामंडळाच्या बसने वेग घेतला असून अनेक मार्गावर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. एसटी महामंडळाच्या बसेसवर सर्वसामान्य नागरिकांचा असलेला विश्वास परत एकदा अधोरेखित झाला आहे.एसटी महामंडळाच्या बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना बाबत सर्व काळजी आम्ही घेत आहोत.येत्या काही दिवसात सर्व मार्गांवरील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू करण्याचे नियाजन आम्ही आखले आहे.- श्रीकांत गभणे ,विभाग नियंत्रक, अमरावती
अमरावती-पुणे शिवशाही आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:01 IST
पहिल्या टप्यात महामंडळाने जिल्हातंर्गत बस फेऱ्या सुरू केल्या. त्यानंतर २० ऑगस्ट पासून जिल्ह्याबाहेर बसफेऱ्या सुरू करण्यात आल्यात. परंतु लांबपल्यावर धावणाऱ्या बसेस बंद होत्या. रविवारी अमरावती - पुणे ही लांबपल्ल्यावर धावणारी पहिली विनावातानुकूलित शिवशाही बस मध्यवर्ती बसस्थानकावरील फलाट क्रमांक ९ वरून सोडण्यिात येणार आहे. सदरची बस ही आसनी, शयनी प्रकारामध्ये सुरू करण्यात येत आहे.
अमरावती-पुणे शिवशाही आजपासून
ठळक मुद्देविनावातानुकूलित : मध्यवर्ती बसस्थानकाहून सायंकाळी ६ वाजता सुटणार