शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"तू नौटंकी आहेस, दोन दिवसात माफी माग, नाहीतर...;" नवनीत राणांवर पोलीस पत्नी संतापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 17:29 IST

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला होता.

अमरावतीत एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलच तापलं होतं. या प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांच्यासह हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. अमरावतीच्या पोलीस ठाण्यात खासदार राणा आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. तेथे कॉल रेकॉर्डिंगवरून त्यांची पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्याशी तू तू मै मै झाली. घरातून बेपत्ता झालेली मुलगी लव्ह जिहाद प्रकरणात अडकली असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी बाचाबाची करत जोरदार राडा घातला होता. संबंधित मुलगी सापडली असून ती घरगुती कारणातून एकटीच घरातून निघून गेल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर पोलीस पत्नी वर्षा भोईर यांनी नवनीत राणा यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांचा एकेरी उल्लेखही केला.

पोलीस पत्नी वर्षा भोईर यांनी नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत संताप व्यक्त केला. “जोपर्यंत तुमझ्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोवर मी शांत बसणार नाही. तू आमचा आत्मसन्मान दुखावला आहे. तू प्रत्येकाला बोलते, काही वैयक्तित दुष्मनी आहे का तुझी? ते जनप्रतिनीधी म्हणून काम करतात. आपल्या कर्तुत्वार मोठे होऊन इथवर आलेत. तुझ्यासारखं किराणा वाटून मतं घेऊन निवडून आले नाही. फक्त राजकारणाच्या तुझ्या तमाशासाठी अमरावतीला बदनान करून राहिली आहे. म्हणतेस अमरावती पोलिसांमुळे बदनाम झालीये, अमरावती पोलिसांमुळे नाही तुझ्यामुळे बदनाम झाली आहे,” असं म्हणत भोईर यांनी संताप व्यक्त केला.“तुला एक संधी देते, तुझ्यात जर माणूसकी आहे तर सर्वांची माफी माग नाहीतर मी तुला सोडणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. “मी पोलीस बंधू बघिनींना आवाहन करते, यापुढे कोणी काही बोललं तर मला सांगा, मी तुमच्यासाठी हजर राहिन,”असंही त्या म्हणाल्या. “पोलिसांची हाय तुला सुखाने जगू देणार नाही. तू त्यांची बदनामी केली आहे, मी आता गप्प बसणार नाही, तू काहीही बोलली तरी मला आता फरक पडणार नाही. पण तुझ्याविरोधात आता मी अविरतपणे लढणार आहे. तू फक्त नौटंकी आहेस, नौटंकीच राहशील आणि नौटंकीच करशील” असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Amravatiअमरावतीnavneet kaur ranaनवनीत कौर राणाPoliceपोलिसLove Jihadलव्ह जिहाद