शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: मेडिकल कॉलेजसाठी ‘एमयूएचएस’ त्रिसदस्यीय चमूने केली जागेची पाहणी

By उज्वल भालेकर | Updated: October 28, 2023 20:04 IST

Amravati: शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शनिवारी ‘एमयूएचएस’ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या त्री-सदस्यीय चमूने जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच डफरीन रुग्णालय परिसरातील आवश्यक जागेची पाहणी केली.

- उज्वल भालेकर  अमरावती - शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शनिवारी ‘एमयूएचएस’ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या त्री-सदस्यीय चमूने जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच डफरीन रुग्णालय परिसरातील आवश्यक जागेची पाहणी केली. महाविद्यालयासाठी निवडण्यात आलेली जागा योग्य आहे की नाही याचा अहवाल ही चमू ‘एमयूएचएसला’ सादर करणार आहे. या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष डॉ. समीर गाेलावार, सदस्य डॉ. पाशू शेख, सदस्य डॉ. रंजीत देशमुख यांचा समावेश असून पाहणीदरम्यान अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळेदेखील उपस्थित होते.

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्नित ४३० खाटांच्या रुग्णालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे १७ सप्टेंबर रोजी अर्ज सादर केला. त्यामुळे लवकरच आता आवश्यक पदस्थापना तसेच पहिल्या वर्षासाठी तीन विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक महाविद्यालयाचे नियोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ‘एमयूएचएस’च्या त्रिसदस्यीय समितीने ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी इर्विन रुग्णालयातील सर्व वाॅर्ड, ओटी, केंद्रीय प्रयाेगशाळा, आयसीयू विभागाची पाहणी केली. तर महाविद्यालयासाठी डफरीन रुग्णालय परिसरातील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, येथील वसतिगृह तसेच फार्मासिस्ट विभागाचे असलेले दोन मोठे हॉल त्याचबरोबर प्री फॅब हॉस्पिटल येथे पाहणी केली आहे. तसेच आवश्यकतेनुसार इतरही इमारतींची पाहणी या चमूने केली आहे. त्यामुळे या चमूने सादर केलेल्या अहवालानंतर पुढील हालचालींना वेग येणार असून, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची चमू जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात आकस्मिक भेट देण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर