शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: आता मंत्र्यांना दौऱ्यासाठी प्रशासनाची घ्यावी लागेल परवानगी; सायरन वाजविण्यास मनाई

By गणेश वासनिक | Updated: March 17, 2024 23:43 IST

Amravati News: केंद्र अथवा राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत प्रशासन कमालीची काळजी घेते. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता मंत्र्यांना त्यांच्या दौऱ्याबाबतची माहिती प्रशासनाला द्यावी लागेल.

- गणेश वासनिक  अमरावती - केंद्र अथवा राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत प्रशासन कमालीची काळजी घेते. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता मंत्र्यांना त्यांच्या दौऱ्याबाबतची माहिती प्रशासनाला द्यावी लागेल. एवढेच नव्हे तर प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय मंत्र्यांना दौरेदेखील करता येणार नाही, अशी आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाचे उपायुक्त जयप्रिये प्रकाश यांनी १६ मार्च रोजी जारी केली आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व अधिकार हे प्रशासनाकडे आले आहेत. आचारसंहितेच्या कालावधीत मंत्री अथवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दौरे हे मतदारांवर प्रवाह पाडणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे. आचारसंहितेनंतर योजनांची अंमलबजावणी करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच शासकीय योजनांना नव्याने मंजुरीस प्रतिबंध लावण्यात आले आहे.

आमदार-खासदारांना या काळात विकासकामे करता येणार नाही, अशी नियमावली आहे. केंद्र वा राज्याच्या मंत्र्यांना मुख्यालयाबाहेर जायचे असेल किंवा दौरा करायचा असल्यास याबाबतची माहिती राज्याच्या मुख्य सचिवांना द्यावी लागणार आहे, अशी वेळ निवडणूक आयोगाने आणली आहे. पूर्व परवानगीशिवाय मंत्र्यांना प्रशासकीय दौरे करता येणार नाही, त्यांच्यासोबत शासकीय स्वीय सहायक असणार नाही. तसेच मंत्र्यांना राज्य शिष्टाचाराचा मोह टाळावा लागेल, असे निर्देश आहेत. निवडणूक कर्तव्यावरील अधिकाऱ्यांची बदलीस ‘ना’आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक कर्तव्यावरील वर्ग १ आणि वर्ग २ अधिकाऱ्याच्या बदली, पदोन्नत्यांवर निर्बंध घातले आहे. एखाद्याप्रसंगी अतिशय गंभीरस्थिती, आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांची बदली आयोगाच्या परवानगीनेच करावी लागेल, असे आदर्श आचारसंहितेत नमूद आहे. शासकीय वाहनांद्वारे प्रचार नाहीचकेंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सहकारी संस्था याशिवाय शासकीय वाहनांचा प्रचारात वापर होणार नाही, याची दक्षता विभागप्रमुखांना घ्यावी लागेल. अन्यथा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सक्तीची कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.

मंत्री, खासदार, आमदारांना अधिकाऱ्यांना बोलावता येणार नाहीलोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर याची गाज मंत्र्यावर पडल्याचे दिसून येते. एरव्ही लहान-सहान कामांसाठी अधिकाऱ्यांना बैठकीत बोलावण्याचे फर्मान मंत्री देत असतात. मात्र, आचारसंहितेच्या कालावधीत मंत्री, खासदार, आमदारांना शासकीय कामांच्या चर्चेसाठी अधिकाऱ्यांना बोलावण्यास निर्बंध घातले आहे. किंबहुना कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास या दोन कारणांसाठी रीतसर परवानगी घेऊन मंत्री, लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना बोलावण्याची मुभा आहे.

मंत्र्यांच्या वाहन सायरनवर बंदी, अन्यथा कारवाईलोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असताना निवडणूक आयोगाने मंत्र्यांच्या वाहनांवरील सायरन वाजविण्यावर बंदी आणली आहे. मंत्र्यांच्या वाहनांचा फौजफाटा, सुरक्षा रक्षकांचा गराडा, आदींवर अंकुश आणले आहे. वाहनांचे सायरन वाजल्यास लाेकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या १२९ (१) नुसार संबंधित मंत्री, खासदार, आमदारांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amravatiअमरावती