शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती : मुद्दल वगळली, यंदा व्याजाचीच वसुली ; चाकर्दा गाव पंचायतचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 18:21 IST

मेळघाटातील गाव पंचायत बँकांनी यंदा वाटलेल्या कर्जाची वसुली करताना मूळ रक्कम वगळून केवळ त्यावरील व्याजाचीच रक्कम वसूल करण्याचा निर्णय चाकर्दा या गावातील पंचायतने घेतला आहे.

-श्यामकांत पाण्डेय

धारणी (अमरावती) : मेळघाटातील गाव पंचायत बँकांनी यंदा वाटलेल्या कर्जाची वसुली करताना मूळ रक्कम वगळून केवळ त्यावरील व्याजाचीच रक्कम वसूल करण्याचा निर्णय चाकर्दा या गावातील पंचायतने घेतला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यांमध्ये गावपाड्यातील पंचायत व्यवस्था सर्वत्र परिचित आहे. या पंचायतींचे वार्षिक ताळेबंद पंचमीदरम्यान सादर करण्यात येत आहे. या पंचायतद्वारे वाटण्यात आलेल्या रकमेवर सवाई व्याजदराने वसुली दरवर्षी करण्यात येते. त्यामुळे पंचायतकडे जमा रकमेत दरवर्षी एक चतुर्थांश रकमेने वाढ होत जाते. मात्र, यंदा गावकºयांची आर्थिक परिस्थिती पाहता, एकूण रक्कम न वसूल करता, केवळ मूळ रकमेवरील व्याजाचीच वसुली करण्याचा निर्णय चाकर्दासह अनेक गावांतील पंचायतींनी घेतला आहे. होळी सणानंतर रोजगाराच्या रकमेतून गाव पंचायतींची रक्कम भरण्यासाठी बाहेरगावावरून आदिवासी बांधव मूळ गावी परतले आहेत. यंदा मूळ रक्कम वसूल न करण्याचा निर्णय पंचायतने घेतल्याने आदिवासींच्या होळीच्या आनंदात भरच पडली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती