शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

IND vs SL T20I : अमरावतीचा जितेश शर्मा भारतीय संघात; पंजाब किंग्सच्या स्फोटक फलंदाजाची एन्ट्री

By गणेश वासनिक | Updated: January 5, 2023 15:12 IST

India vs Sri Lanka : संजू सॅमसन याला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर व्हावं लागलं आहे. सॅमसनच्या जागी आता आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जकडून लक्षवेधी कामगिरी केलेल्या जितेश शर्मा याला संधी देण्यात आली आहे.

अमरावती - विदर्भाचे रणजी करंडक क्रिकेटमध्ये प्रतिनिधीत्व करणारा अमरावतीचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा ( Jitesh Sharma) याची भारतीय संघात निवड झाली आहे.  भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतून संजू सॅमसन याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. सॅमसनच्या जागी आता आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जकडून लक्षवेधी कामगिरी केलेल्या जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय खेळाडू गोलंदाज उमेश यादव हा आयपीएलमध्ये खेळत असून त्याच्यासह यंदा वैदर्भीय म्हणून विदर्भाचा यष्टीरक्षक फलंदाज मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. सलामीला चांगली सुरुवात देणारा अशी जितेशची ख्याती आहे. याआधी मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज अपूर्व वानखडेची मुंबई इंडियन्सने निवड केली होती. परंतु, त्याला प्रत्यक्ष आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

पंजाब किंग्सने जितेशला करारबद्ध करण्याची ही सलग दुसरी वेळ होय, गतवर्षीही त्याला PBKSने करारबद्ध केले होते. परंतु, राखीव खेळाडू तसेच भविष्यात उपयोगी ठरेल म्हणून त्याला संघात घेण्यात आले होते. यष्टीरक्षणासोबतच सलामीला विदर्भाकडून जितेशने यंदाच्या मोसमात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे यंदा त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता असल्याचे मत त्याचे अमरावती येथील प्रशिक्षक प्रा. दीनानाथ नवाथे व सहायक प्रशिक्षक आल्हाद लोखंडे यांनी व्यक्त केले.   विशेष बाब अशी की, राजस्थानविरुद्ध टी २० सामन्याच्या अंतिम षटकात विदर्भाला १४ धावांची आवश्यकता असताना अपूर्वने विजय मिळवून दिला. या कामगिरीमुळेच त्याची सुरेश रैनाच्या नेतृत्त्वातील मध्य विभाग संघात वर्णी लागली आहे. जितेशनेही टी२० स्पर्धेत सलामीवीर म्हणून अर्धशतकी खेळी केली आहे. यंदा त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली तर नवीन यष्टीरक्षक फलंदाज म्हणून तो नावारुपाला येऊ शकतो.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :IPLआयपीएल २०२२Amravatiअमरावती