शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती वसतिगृह रॅगिंग प्रकरण : 6 विद्यार्थिनींना अटक,संचालकाविरुद्धही गुन्हे नोंदवण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 20:37 IST

गणेश देशमुख/अमरावती, दि. 2 - शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतील (व्हीएमव्ही) मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या रॅगिंगप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी सकाळी पाच मुलींना वसतिगृहातून अटक केली. अन्य एक मुलगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने सुटी होताच तिला अटक केली जाईल. महाराष्ट्र रॅगिंग कायदा १९९९ च्या कलम ४, ३४१, ३४२, ३५४ अन्वये गुन्हे दाखल करून ही ...

गणेश देशमुख/अमरावती, दि. 2 - शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतील (व्हीएमव्ही) मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या रॅगिंगप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी सकाळी पाच मुलींना वसतिगृहातून अटक केली. अन्य एक मुलगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने सुटी होताच तिला अटक केली जाईल. महाराष्ट्र रॅगिंग कायदा १९९९ च्या कलम ४, ३४१, ३४२, ३५४ अन्वये गुन्हे दाखल करून ही कारवाई करण्यात आली. अत्यंत गंभीर प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून संस्थेच्या संचालक अर्चना नेरकर यांच्याविरुद्ध तातडीने ‘निग्लिजन्स अ‍ॅक्ट’अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याचे आदेश अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना शनिवारी दिले. प्रवीण पोटे पाटील यांनी हे दुपारी शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत गेले आणि तक्रारकर्त्या मुलींकडून सर्व प्रकारची माहिती घेतली. पीडित मुलींनी अनेक गंभीर आणि धक्कादायक मुद्दे पालकमंत्र्यांना सांगितले. त्यांनी रॅगिंग करणाºया मुलींशीही संवाद साधला. त्यानंतर त्यांनी संचालकांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले. पालकमंत्री तेथून गेल्यानंतर अर्चना नेरकर संस्थेत पोहोचल्या. ‘लोकमत’च्या संबंधित बातमीदाराची पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांशी चर्चा होत असल्याचे फूटेज पाहून ‘तुम्ही सांगितले म्हणूनच हे सारे घडले,’ असा हास्यास्पद आरोप त्यांनी 'लोकमत'वर केला. 

काय आहे प्रकरण?वसतिगृहातील एम.ए. द्वितीय वर्षाच्या मुलींनी २७ आॅगस्ट रोजी बी.एस्सी. द्वितीय वर्षाच्या मुलींना विवस्त्र करून त्यांचा मासिकधर्म अर्थात ऋतुस्राव तपासल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याबाबत ४३ मुलींनी तक्रार करूनही 'अ‍ॅन्टि रॅगिंग कमिटी'ने पाच दिवस पोलीस तक्रार नोंदविली नव्हती. उलटपक्षी तक्रारकर्त्या मुलींवर प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव आणला जात होता. रॅगिंगचा हा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी त्वरेने दखल घेतली. अ‍ॅन्टि रॅगिंग कमिटीचे प्रमुख विवेक मधुकर राऊत (४२) यांनी शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांत तक्रार नोंदविली. शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास गाडगेनगर पोलिसांनी गुन्हे नोंदविले. शनिवारी पहाटे मुलींना अटक केली. अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटीच्या अहवालावरून सहा मुलींविरुद्ध गुन्हे दाखल केले. पाच मुलींना अटक केली. डायरेक्टरची ‘निग्लिजन्सी’ तपासली जात आहे. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त, अमरावती

टॅग्स :Crimeगुन्हा