शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: आदिवासींच्या प्रश्नांवर सरकार अन् आमदार, खासदारांना आता मिळाली फुरसत

By गणेश वासनिक | Updated: August 27, 2023 15:47 IST

Amravati: राष्ट्रीय जनजाती आयोगाने २०१२ च्या अहवालात सूचना केल्यानुसार जनजाती सल्लागार परिषदेच्या वर्षातून किमान ४ बैठका अन् चार वर्षात आजपर्यंत १६ बैठका व्हायला पाहिजे होत्या.

- गणेश वासनिकअमरावती - राष्ट्रीय जनजाती आयोगाने २०१२ च्या अहवालात सूचना केल्यानुसार जनजाती सल्लागार परिषदेच्या वर्षातून किमान ४ बैठका अन् चार वर्षात आजपर्यंत १६ बैठका व्हायला पाहिजे होत्या. परंतु सरकारच्या दप्तरी आदिवासींच्या समस्या व प्रश्नांना गौण स्थान असल्यामुळे चार वर्षात जनजाती सल्लागार परिषदेची पहिली बैठक मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली ३१ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणार आहे. ५१ वी बैठक राज्यातील आदिवासी समाजाच्या समस्या आणि प्रश्न सुटावे म्हणून जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकांसाठी ‘लोकमत’ने सरकारला जागे करण्यासाठी वारंवार वृत्त प्रकाशित केले, हे विशेष.

राज्यात २५ नोव्हेंबर २०१९ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यांच्या कार्यकाळात सरकारला आणि आदिवासी समाजाच्या आमदार, खासदारांना अजिबात फुरसत मिळाली नाही. परिणामी जनजाती सल्लागार परिषदेची एकही बैठक झाली नाही. त्यानंतर ३० जून २०२२ रोजी शिंदे-फडणवीस यांचे राज्यात सरकार आले. त्यांच्याही काळात आजपर्यंत जनजाती सल्लागार परिषदेची एकही बैठक झाले नाही. परंतु आदिवासींचा समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी आता कुठे सरकार आणि आदिवासी आमदार, खासदारांना फुरसत मिळाली आहे.

भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचितील भाग - ख मधील परिच्छेद ४ (१) अनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणाच्या योजना, धोरण, कार्यक्रमाचे नियमन आणि आदिवासींच्या विकासाच्या संदर्भातील विचारलेल्या विषयांच्या बाबतीत राज्यपाल यांना सल्ला देणे याकरिता जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे. १ जानेवारी २०१० पासून ते २० फेब्रुवारी २०१९ पर्यंत जनजाती सल्लागार परिषदेच्या केवळ पाच बैठका झालेल्या आहेत. परंतु गेल्या चार वर्षांत या जनजाती सल्लागार परिषदेची एकही बैठक झालेली नव्हती. या जनजाती सल्लागार परिषदेत राज्यातील २४ आदिवासी आमदार, ३ खासदार व १ आदिवासी संबंधी तज्ञ असे एकूण २८ जणांचा समावेश आहे.

उशिरा का होईना मायबाप सरकारला आदिवासींचे प्रश्न व समस्यांची आठवण झाली. राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या सुचनेनुसार बैठका व्हाव्यात म्हणून 'ट्रायबल फोरम' संघटनेने मोठा पाठपुरावा केला. मात्र आता सरकार आणि आदिवासी आमदार, खासदारांनी वर्षानुवर्षे प्रलंबित आदिवासी समाजाच्या समस्या व प्रश्न सोडवावे.- महानंदा टेकाम राज्य संघटक ट्रायबल वुमेन्स फोरम

टॅग्स :Mantralayaमंत्रालयGovernmentसरकारAmravatiअमरावती