शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जीएमसी कारवाईची टांगती तलवार कायम ! एमबीबीएस जागांवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:17 IST

Amravati : एनएमसीच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष, नियामक मानकांचे उल्लंघन झाल्याचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गत शैक्षणिक वर्षात सुरू झालेल्या अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एनएमसी) च्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. महाविद्यालयातील उपलब्ध पायाभूत सुविधा व शिक्षकांची रिक्त पदे यावर बोट ठेवत एनएमसीने नियामक मानकाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे १८ जूनला दिल्लीत यावर सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर एनएमसी काय पाऊल उचलणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांची तपासणी अलीकडेच महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठाच्या पथकांनी केली होती. या पथकांनी सादर केलेल्या अहवालात शासकीय मेडिकल कॉलेजमधील पायाभूत सुविधांमध्ये मोठी कमतरता दिसून आली होती. शिवाय, निकषांच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी शिक्षक वर्ग उपलब्ध असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला होता. त्यामुळे आयोगाने मेंटेनन्स ऑफ स्टैंडर्ड मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन २०२३ च्या प्रकरण ३ मधील कलम ८ चा वापर करून राज्यातील ३० च्या जवळपास वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यामध्ये अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा देखील समावेश आहे; परंतु यावर दिलेले उत्तर हे समाधानकारक तसेच पटण्यासारखे नसल्याने १८ जूनला यावर दिल्ली येथे सुनावणी पार पडली. त्यामुळे यावर एनएमसी नेमका काय निर्णय घेते, याकडे वैद्यकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

एमबीबीएस जागांवर प्रश्नचिन्हनीट परीक्षेचा निकाल लागल्याने प्रवेश प्रक्रियादेखील सुरू होईल; परंतु एनएमसीने त्रुटीसंदर्भात उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नामुळे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी एमबीबीएसच्या जागांच्या वार्षिक नूतनीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्रुटी दूर करण्यासाठी संस्थांकडून प्रयत्न नाहीएनएमसीच्या मूल्यांकनामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी सादर केलेली स्व प्रमाणित घोषणापत्र, आधार-सक्षम बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीत प्राध्यापकांची उपस्थिती, क्लिनिकल मापदंड व पायाभूत सुविधा यावर आधारित होते. त्यात त्रुटी निघाली. 

"एनएमसीने १८ जूनला दिल्ली येथे सुनावणीसाठी बोलावले आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग आपली बाजू मांडेल. सध्या शिक्षक वर्गाच्या भरती प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे."- डॉ. किशोर इंगोले, अधिष्ठाता, अमरावती मेडिकल कॉलेज

टॅग्स :Amravatiअमरावती