शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरणारी चौकडी ‘क्राईम’कडून जेरबंद; ११ दुचाकी जप्त

By प्रदीप भाकरे | Updated: June 23, 2024 17:10 IST

आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता

अमरावती : शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या चार सराईत चोरांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने रविवारी अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. हेमंत राजेश चिलवंते (२३, रा. पाचबंगला, बडनेरा), प्रदीप विजय बांगर (१९, रा. अंबिकानगर, अकोला), रोशन राजू गावंडे (२४, रा. पाचबंगला, बडनेरा) व अमित नरेश ग्वालानी (३४, रा. सिंधी कॅम्प, बडनेरा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक राजापेठ ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या एका गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासात त्या गुन्ह्यात हेमंत, प्रदीप, रोशन व अमित या चौघांचा हात असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी राजापेठच्या गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच आणखी काही दुचाकी चोरी केल्याची माहितीही दिली. त्यानुसार त्यांच्याकडून शहरातील विविध भागांतून चोरलेल्या ४ लाख १७ हजार रुपयांच्या तब्बल ११ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेशकुमार इंगोले व सत्यवान भुयारकर, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, जावेद अहेमद, गजानन ढेवले, दीपक सुंदरकर, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, चंद्रशेखर रामटेके, चेतन कराडे, योगेश पवार, राजीक रायलीवाले, संदीप खंडारे, प्रतीक यादव यांनी केली.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस